तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 01:53 PM2021-12-20T13:53:10+5:302021-12-20T13:55:27+5:30

Gay couple Marriage: तेलंगनात समलैंगिक पुरूषांचं पहिलं लग्न पार पडलं. यावेळी सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी साधारण त्यांचं १० वर्षांचं नातं पुढे नेत लग्न केलं.

First time gay couple marriage in Telangana | तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय

तेलंगनात पहिल्यांदाच गे कपलचं थाटात लग्न, ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला हा निर्णय

Next

हैद्राबादमधील (Hyderabad) समलैंगिक जोडप्याने आपल्या परिवार आणि खास मित्रांसोबत एका कार्यक्रमात अंगठ्या एक्सचेंज केल्या आणि लग्न करून त्यांचं नातं अधिकृत केलं. हा लग्न सोहळा एका हैद्राबादच्या बाहेरील एका रिसॉर्टमध्ये पार पडला. यावेळी पंजाबी आणि बंगाली पद्धतीने रितीरिवाज (Gay couple Marriage) करण्यात आले. दोघांपैकी एक सुप्रियो कोलकाता तर अभय दिल्लीतील आहे.

तेलंगनात पहिलं समलैंगिक लग्न

तेलंगनात (Telangana) समलैंगिक पुरूषांचं पहिलं लग्न पार पडलं. यावेळी सुप्रियो चक्रवर्ती आणि अभय डांग यांनी साधारण त्यांचं १० वर्षांचं नातं पुढे नेत लग्न केलं. सुप्रियो म्हणाला की, त्यांच्या लग्नाने सर्वांना एक मजबूत संदेश दिला की, खूश राहण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसते. समलैंगिक पुरूषांना तेलंगनातील पहिलं समलैंगिक जोडपं मानलं जात आहे. दोघांची लव्हस्टोरी ८ वर्ष जुनी आहे आणि आता दोघांनी रॉयल अंदाजात लग्न केलं.

सुप्रियो म्हणाला की, हे लग्न रजिस्टर करण्यात आलं नाही. पण लग्नात परिवारातील लोक आणि खास मित्र आले होते. ३१ वर्षीय सुप्रियो आणि ३४ वर्षीय अभयने अंगठ्या एक्सचेंज केल्या आणि एका रिसॉर्टमध्ये लग्न बंधनात अडकले. या लग्नाला त्यांचे काही एलजीबीटीक्यू समुदायातील मित्रही आले होते.
 

Web Title: First time gay couple marriage in Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.