शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

PNB scam: सोशल मीडियावर 'छोटा मोदी’ आणि 'फाईंडिंग निमो' ट्रेंडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 13:29 IST

नेटिझन्सकडून कमालीची क्रिएटिव्हिटी वापरली जात आहे.

मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीमुळे सत्ताधारी भाजप चांगलाच अडचणीत आला आहे. या घोटाळ्यानंतर विरोधकांसह सोशल मीडियावर होत असलेल्या खोचक टीकेने भाजपाचे नेते चांगलेच बेजार झाले आहेत. गेल्या चार वर्षांच्या काळात विरोधकांकडून भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करायला विरोधक काहीसे कचरत होते. सोशल मीडियावरही मोदींनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधानपदाभोवती जे वलय निर्माण झाले होते, त्या भीतीने का होईना, नरेंद्र मोदींची थट्टा करायला नेटिझन्स बिचकत असत. मात्र, नीरव मोदीचा घोटाळा बाहेर आल्यापासून विरोधक आणि नेटिझन्स दोघेही कमालीचे आक्रमक झाले आहेत. यापूर्वी बेहिशेबी संपत्तीचे आरोप झाल्यानंतर फरार झालेला ललित मोदी आणि नीरव मोदी यांच्या आडनावाशी असलेल्या नामसार्धम्यामुळे नरेंद्र मोदी कधी नव्हे इतके अडचणीत आले आहेत. मोदी या प्रकरणानंतर गप्प आहेत. त्यामुळे सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्याचे नीरव मोदीला अभय तर नाही ना? असा प्रश्न विरोधकांसह देशातील जनताही विचारत आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील नीरव मोदी प्रकरणावरून मोदींवर निशाणा साधला होता. ‘मोदींना मिठी मारा आणि १२ हजार कोटी लुटा, हा फरार मोदी दाव्होसमध्ये पंतप्रधानांसोबत दिसला आणि त्यांच्याशी असलेल्या संबधांचा वापर करून तो देशाबाहेर पळाला. ‘ अशी टीका केली त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी या फरार नीरव मोदीचं नामकरण ‘छोटा मोदी’ केलं आहे.  या प्रकरणावर मौन बाळगून असलेले पंतप्रधान मोदी आणि फसवणूक केलेल्या नीरव मोदीवर ‘#छोटा_मोदी’ हा हॅशटॅश वापरून ट्विपल्स टीका करत आहेत. तर 'फाईंडिंग नीमो' या अॅनिमेटेड चित्रपटाच्या पोस्टरचे विडंबन करूनही 'मोदी' फॅक्टर अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही सगळी टीका करताना नेटिझन्सकडून कमालीची क्रिएटिव्हिटी वापरली जात आहे. एरवी राजकीय विरोधकांच्या शेलक्या टीकेला तत्त्परतेने प्रत्युत्तर देणाऱ्या भाजपा नेते सोशल मीडियावरील आरोपांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. 

ये चारों 'P' ने देश मे भूचाल मचा दिया है ।प्रियापकोड़ापदमावतपंजाब नेशनल बैंक

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा