गुगल सर्चवर शोधा ट्विट्स

By Admin | Updated: February 6, 2015 18:11 IST2015-02-06T16:59:58+5:302015-02-06T18:11:50+5:30

ट्विटर आणि गुगल, इंटरनेटच्या जगातील या बलाढ्य कंपन्यांनी करार केला आहे. या करारामध्ये ट्विटस् गुगलसर्च केले असता ते इंटरनेट युजर्सना सहज उपलब्ध होणार आहेत.

Find Google Search Tweets | गुगल सर्चवर शोधा ट्विट्स

गुगल सर्चवर शोधा ट्विट्स

>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि.६ - ट्विटर आणि गुगल, इंटरनेटच्या जगातील या बलाढ्य कंपन्यांनी करार केला आहे. या करारामध्ये ट्विटस् गुगलसर्च केले असता ते इंटरनेट युजर्सना सहज उपलब्ध होणार आहेत.
ट्विटर या सोशल साइटवर केले जाणारे ट्विटस् गुगल कंपनीला सहज उपलब्ध होणार असून या करारातून दोन्ही कंपन्यांना नफा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही योजना प्रत्यक्षात उतरवण्याकरता दोन्ही कंपन्यांचे इंजिनिअर एकत्र काम करत आहेत. हा करार येत्या सहा महिन्यात आमलात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्विटरचे वरीष्ठ संचालक अमित रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्विटर या साइटवर हजारो कंपन्यांचे अकाऊंट असून या कंपन्यांना ट्विटर व गुगलमधील करारमुळे एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचता येईल.
 

Web Title: Find Google Search Tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.