गगनात साखरपुडा..
By Admin | Updated: January 3, 2016 02:51 IST2016-01-03T02:51:23+5:302016-01-03T02:51:23+5:30
आपला साखरपुडा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण व्हावा, या हेतूने साताऱ्यातील नवजोडप्याने चक्क अरबी समुद्रात १00 फूट उंच आकाशात पॅरासेलिंगवर साखरपुडा केला.

गगनात साखरपुडा..
दापोली : आपला साखरपुडा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण व्हावा, या हेतूने साताऱ्यातील नवजोडप्याने चक्क अरबी समुद्रात १00 फूट उंच आकाशात पॅरासेलिंगवर साखरपुडा केला. दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी रंगलेला हा अनोखा सोहळा शनिवारी दिवसभर चर्चेचा विषय झाला होता.
साताऱ्यातील मनाली वाळिंबे व रोहन कुलकर्णी या जोडप्याने हा क्षण केवळ आपल्याच नाही, तर अनेकांच्या लक्षात राहील, अशा पद्धतीने साजरा केला. वाळिंबे व कुलकर्णी कुुटुंबीय शुक्रवारीच मुरुड येथे दाखल झाले होते.