शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावर शेती आता शक्य होणार? वैज्ञानिकांनी उगवले चंद्रावर रोपटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 19:06 IST

चंद्राच्या मातीत प्रथमच झाड वाढवण्यात त्यांना यश आले आहे. ही माती काही काळापूर्वीच नासाच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती.

चंद्रावर मानवांची वसाहत करण्यासाठी वैज्ञानिक अनेक शोध लावत आहेत. याचदरम्यान अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चंद्राच्या मातीत प्रथमच झाड वाढवण्यात त्यांना यश आले आहे. ही माती काही काळापूर्वीच नासाच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनी त्यांच्यासोबत आणली होती.

चंद्रावरील शेतीच्या दिशेने पहिले पाऊलकम्युनिकेशन्स बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोणतेही झाड केवळ पृथ्वीच्या मातीतच नाही, तर अवकाशातून आलेल्या मातीतही वाढू शकतात. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी चंद्राच्या रेगोलिथला वनस्पतींच्या जैविक प्रतिसादाचे परीक्षण केले. चंद्रावर अन्न आणि ऑक्सिजनसाठी शेती करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.

फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्रोफेसर अ‍ॅना-लिसा पॉल यांनी सांगितले की, या प्रयोगापूर्वीही चंद्राच्या मातीत वनस्पती वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर त्या झाडांवर केवळ चंद्राची माती शिंपडण्यात आली. अलीकडच्या संशोधनात ही वनस्पती चंद्राच्या मातीत पूर्ण वाढलेली आहे. संशोधकांनी झाडे वाढवण्यासाठी ४ प्लेट्स वापरल्या. यामध्ये असे पोषक तत्व पाण्यात मिसळले होते, जे चंद्राच्या मातीत सापडत नाहीत. यानंतर या द्रावणात अरेबिडोप्सिस वनस्पतीच्या बिया टाकल्या. काही दिवसातच या बियांनी लहान रोपाचे रूप धारण केले.

फक्त १२ ग्रॅम माती वापरलीनासाच्या अपोलो मोहिमेतील ६ अंतराळवीर ३८२ किलो वजनाचे दगड घेऊन चंद्रावरून पृथ्वीवर परतले. हे दगड शास्त्रज्ञांमध्ये वाटण्यात आले. फ्लोरिडा विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट फेरी यांच्या म्हणण्यानुसार, ११ वर्षांत ३ वेळा अर्ज केल्यानंतर त्यांना नासाकडून १२ ग्रॅम माती मिळाली. एवढ्या मातीत काम करणे खूप अवघड होते, पण अखेरीस ते यात झाड वाढवण्यात यशस्वी झाले. अपोलो ११, १२ आणि १७ मोहिमेदरम्यान ही माती गोळा करण्यात आली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके