शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

हर कुत्ते का दिन आता है! मध्य प्रदेशातला जॅकी अचानक बनला करोडपती

By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 4:35 PM

शेतकऱ्यानं कुत्र्याच्या नावावर केली निम्मी संपत्ती

छिंदवाडा: चित्रपट हा समाजाचा आरसा असल्याचं म्हणतात. समाजात जे घडतं, त्याचं प्रतिबिंब आपल्याला अनेकदा चित्रपटात पाहायला मिळतं. पण याच्या अगदी उलट घडलं तर? चित्रपटातली कथा प्रत्यक्षात घडू लागली तर? मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये घडलेल्या घटनेमुळे अनेकांना हाच प्रश्न पडला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एंटरटेनमेंट चित्रपटाची कहाणी छिंडवाड्यात प्रत्यक्ष घडली आहे.एक उद्योगपती आपली संपूर्ण संपत्ती इमानदार कुत्र्याच्या नावावर करतो, असं एंटरटेनमेंट चित्रपटाचं कथानक आहे. या कुत्र्याचं नाव एंटरटेनमेंट असतं. छिंदवाड्यातल्या एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्यानंदेखील त्याची संपत्ती कुत्र्याच्या नावे केली आहे. या कुत्र्याचं नाव जॅकी आहे. मुलाची वर्तणूक चांगली नसल्यानं ओम नारायण वर्मा यांनी त्यांची अर्धी संपत्ती कुत्र्याच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला. जॅकी ओम नारायण यांची काळजी घेतो. तो सदैव त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे वर्मा यांनी जॅकीला संपत्तीत निम्मा वाटा दिला आहे. जॅकीचा सांभाळ करणाऱ्याला त्याच्या नावे असलेली संपत्ती मिळेल, असं वर्मांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं आहे.

छिंदवाड्याच्या बारी बडा गावात राहणाऱ्या ५० वर्षीय ओम वर्मा यांनी दोन लग्नं केली. पहिल्या पत्नीपासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तर दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली आहेत. ओम वर्मा यांनी त्यांच्या संपत्तीचा निम्मा हिस्सा त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर केला आहे. तर उर्वरित निम्मा हिस्सा कुत्रा जॅकीच्या नावे केला आहे.माझी दुसरी पत्नी चंपा वर्मा आणि कुत्रा जॅकीच माझा सांभाळ करतात, असं वर्मा यांनी मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे. 'पत्नी चंपा आणि जॅकी कुत्रा यांच्यावर माझं सर्वाधिक प्रेम आहे. त्यामुळे माझ्या संपत्तीत दोघांना अर्धा-अर्धा वाटा मिळेल. पुढे जी व्यक्ती जॅकीची काळजी घेईल, त्यालाच त्याच्या मालकीची संपत्ती मिळेल,' असं वर्मा यांनी मृत्यूपत्रात म्हटलं आहे.