फेसबुक लवकरच गाठणार 2 अब्ज युजर्सचा टप्पा

By Admin | Updated: February 7, 2017 19:46 IST2017-02-07T18:50:21+5:302017-02-07T19:46:51+5:30

सोशल नेटवर्कमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबुक संकेतस्थळ लवकरच आपल्या युजर्सचा दोन अब्जचा टप्पा गाठणार आहे.

Facebook will soon reach the 2 billion user stage | फेसबुक लवकरच गाठणार 2 अब्ज युजर्सचा टप्पा

फेसबुक लवकरच गाठणार 2 अब्ज युजर्सचा टप्पा

>ऑनलाइन लोकमत 
सॅन फ्रॅन्सिको, दि. 07- सोशल नेटवर्कमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबुक संकेतस्थळ लवकरच आपल्या युजर्सचा दोन अब्जचा टप्पा गाठणार आहे.
गेल्या वर्षाच्या शेवटच्या म्हणजे 2016 मधील तिमाहीत 1.86 अब्ज युजर्स जगभरात फेसबुकवर सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, याच वर्षातील मागील तिमाहीत 1.79  अब्ज युजर्सकडून फेसबुकचा वापर करण्यात आला. तसेच, आणखीन नवीन युजर्स फेसबुकवर लॉग इन करत आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्याभरातच फेसबुक आपल्या युजर्सचा दोन अब्जचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 
फेसबुक युजर्स वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे. तसेच, थर्ड पार्टीच्या माध्यमातून भारतासारख्या देशांमध्ये   ‘Internet.org’  ही मोफत इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे फेसबुकवरील युजर्सच्या संख्येत वाढ होत असल्याचे कंपनीचे सीएफओ डेव्हिड वेहनर यांनी सांगितले. तर आमचा व्यवसाय 2016 मध्ये चांगला झाला. मात्र, आम्हाला यापुढे अधिक काम करायचे असून लोकांना एकत्र आणण्यास मदत करायची आहे, असे फेसबुकचे सीईओ आणि सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग  यांनी सांगितले.

Web Title: Facebook will soon reach the 2 billion user stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.