शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इतर गाड्यांसारखा विमानालाही असतो हॉर्न, पण ना ट्रॅफिक, ना काही मग हॉर्न असतो तरी कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:15 IST

Airplane Horn Interesting Facts : विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. पण मग असा प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? पाहुया याचं कारण...

Airplane Horn Interesting Facts : एखादं वाहन चालवताना हॉर्न किती महत्वाचा असतो हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. कार असो, बाइक असो किंवा आणखी काही हॉर्न महत्वाचाच असतो. जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता यावी. हॉर्नचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तुम्ही ऐकले असतील. रेल्वे सुद्धा प्लॅटफॉर्महून निघताना, थांबताना हॉर्न वाजवते. पण आपण कधी विमानात असलेल्या हॉर्नबाबत ऐकलंय का? अनेकांना हे माहीत नसतं की, विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. पण मग असा प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? पाहुया याचं कारण...

का असतो विमानाला हॉर्न?

सामान्यपणे समोरच्या गाडीला इशारा देण्यासाठी किंवा साइड मागण्यासाठी हॉर्नचा वापर केला जातो. पण विमानातील हॉर्नचं असं काही काम नसतं. कारण एकाच रूटवर दोन विमाने समोरासमोर येण्याची शक्यता फार कमी असते. त्याशिवाय विमानातील हॉर्नचा वापर पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी सुद्धा केला जात नाही.

मुळात विमानातील हॉर्नचा वापर ग्राउंड इंजिनिअर आणि स्टाफसोबत संपर्क करण्यासाठी केला जातो. जर विमानात उड्डाण घेण्याआधी काही गडबड झाली असेल किंवा एखादी इमरजन्सीसारखी स्थिती आली असेल तेव्हा विमानाचे पायलट हॉर्न वाजवून ग्राउंड इंजिनिअर अलर्ट मेसेज देतात.

कुठं लावला असतो हॉर्न?

विमानातील हॉर्न लॅंडिंग गिअरच्या कम्पार्टमेंटमध्ये लावलेला असतो आणि याचं बटन विमानाच्या कॉकपिटमध्ये असतं. या बटनावर जीएनडी असं लिहिलेलं असतं. हे बटन दाबल्यावर विमानाचं अलर्ट सिस्टीम चालू होतं आणि यातून सायरनसारखा आवाज येतो.

विमानातील ऑटोमॅटिक हॉर्नच्या आवाजात का असतो फरक?

विमानात ऑटोमॅटिक हॉर्नही लावलेले असतात, जे सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यावर किंवा आग लागल्यावर आपोआप सुरू होतात. याची खास बाब म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो. सिस्टीममध्ये काय बिघाड झालाय त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारे वाजतात. या आवाजावरून एअरक्राफ्ट इंजिनिअरला हे समजतं की, विमानातील कोणत्या भागात बिघाड झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Airplanes have horns like cars, but why?

Web Summary : Airplanes have horns for ground communication, not traffic. Pilots use them to alert engineers to issues before takeoff or during emergencies. Horns are located in the landing gear compartment and triggered from the cockpit.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेairplaneविमान