शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

88 वर्षीय वृद्धाने फळं विकणाऱ्याला दिली आपली सगळी प्रॉपर्टी, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 09:29 IST

ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे मा नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने 3 वर्षाआधी असा निर्णय घेतला होता की, तो त्याची पूर्ण प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर करेल.

एका 88 वर्षीय वयोवृद्धाने आपल्या सगळी प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केली. त्याच्या फ्लॅटची किंमत 3.84 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. व्यक्तीच्या निर्णयामुळे त्याच्या परिवारातील लोकांना चांगलाच धक्का बसला. जेव्हा यामागचं कारण समोर आलं तेव्हा वृद्ध व्यक्तीलाच योग्य ठरवण्यात आलं. ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे मा नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने 3 वर्षाआधी असा निर्णय घेतला होता की, तो त्याची पूर्ण प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर करेल. ज्याच्यासोबत त्याचं रक्ताचं नातंही नाही. हे सगळं त्याने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं. 

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, फळं विकणाऱ्या व्यक्तीचं नाव लियु आहे. त्याच्या नावावर मा ने आपली प्रॉपर्टी केली कारण त्याने या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूआधी काही वर्ष काळजी घेतली होती. काही वर्षाआधी लियु आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत मा याच्या घरी रहायला आला होता. त्याने आणि त्याच्या परिवाराने मा यांची काळजी घेतली. 

31 डिसेंबर 2021 ला वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. तेव्हा त्याच्या तीन बहिणींनी बॅंक अकाऊंट सर्टिफिकेट लियुला देण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, त्यांच्या भावाच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे. यानंतर लियुने कोर्टात धाव घेतली. मा यांच्या तीन बहिणींचं म्हणणं आहे की, त्यांच्या वृद्ध भावाने मृत्यूआधी 2020 मध्ये लियुसोबत एका करारावर सही केली होती. ज्यात लिहिलं होतं की, जिवंत असेपर्यंत लियु त्यांची देखरेख करेल आणि मृत्यूनंतर त्यांची सगळी संपत्ती लियुला मिळेल. 

बहिणींनी दावा केला की, मा यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्यांना विसरण्याची समस्या होती. अशावेळी त्यांच्या कागदपत्रावर हस्ताक्षर करून घेण्यात आले. पण नोटरी अधिकाऱ्यांनी परिवाराचा दावा फेटाळला. ते म्हणाले की, वृद्ध व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्णपणे चांगली होती.

या महिन्यात बाओशान कोर्टाने यावर निर्णय दिला. न्यायाधीश म्हणाले की, अग्रीमेंट कायदेशीर आहे आणि आदेश दिला की, मा यांचं घर आणि पैसा सगळं लियुला देण्यात यावं. रिपोर्टनुसार, लियु हा मा यांच्या घराजवळ फळं विकत होता. मा यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू मानसिक आजारामुळे झाला होता. अशात लियु हाच त्यांची काळजी घेत होता. मा यांच्या नातेवाईकांकडील कुणीही त्यांच्या मुलाच्या अंत्यसंस्काराला आले नव्हते. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही त्यांना भेटायला कुणी आलं नव्हतं. तेव्हा त्यांच्यासोबत फक्त लियु होता. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके