शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षे दगड म्हणून घरात ठेवली समुद्रात सापडलेली वस्तू, वस्तुस्थिती समजल्यावर बसला 440 व्होल्टचा धक्का  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 17:54 IST

महाकाय सागराच्या उदरात अनेक आश्चर्ये दडलेली आहेत. बऱ्याचदा अगदी अनपेक्षितपणे अशा वस्तू मानवाच्या हाती लागतात.

मानिला - महाकाय सागराच्या उदरात अनेक आश्चर्ये, मौल्यवान रत्ने दडलेली आहेत. बऱ्याचदा अगदी अनपेक्षितपणे अशी रत्ने मानवाच्या हाती लागतात. फिलिपिन्समधील पालवन बेटावर राहणाऱ्या एका मच्छिमाराच्या हाती असाच एक विचित्र दगड लागला आणि त्या दगडाने या मच्छिमाराला अब्जाधीश बनवले.  त्याचे झाले असे की, हा मच्छिमार मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेला होता. तो मासे पकडत असताना अचानक वादळ आले. त्या वादळात तो अडकला. वादळाचा जोर वाढल्याने त्याने जीव वाचवण्यासाठी एका दगडाचा आधार घेतला. त्या दगडाच्या आधारावर जीव मुठीत धरून तो वादळ शमण्याची वाट पाहू लागला. अखेर वादळ थांबले आणि त्या मच्छिमाराचाही जीव वाचला. ज्या दगडामुळा आपला जीव वाचला त्याला भाग्यवान समजून तो मच्छिमार तो दगड आपल्या घरी घेऊन गेला. सुमारे दहा वर्षे हा दगड त्या मच्छिमाराने आपल्या घरी ठेवला. मात्र एके दिवशी अचानक त्याच्या घराला आग लागली. त्यानंतर एका टुरिस्ट ऑफिसर तेथे आला असता त्याची नजर त्या दगडावर पडली. त्याने या दगडाविषयी मच्छिमाराकडे विचारणा केली. तेव्हा मच्छिमाराने सारी हकीकत सांगितली. मच्छिमाराचे म्हणणे ऐकल्यानंतर हा साधासुधा दगड नसून एक विशाल मोती असल्याचे त्या टुरिस्ट ऑफिसरने सांगितले. ते ऐकताच मच्छिमाराला आश्चर्याचा धक्का बसला. हा मोती विक्रीसाठी ठेवला असता त्याला तब्बल 6 अब्ज 53 कोटी इतकी प्रचंड किंमत मिळाली. आणि हा गरीब मच्छिमार अब्जाधीश झाला.  

टॅग्स :jewelleryदागिने