lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अरे वा ! भारतातील 'या' कंपनीमध्ये दर महिन्याला होते पगारवाढ

अरे वा ! भारतातील 'या' कंपनीमध्ये दर महिन्याला होते पगारवाढ

भारतातल्या अशी एका कंपनी आहे तिथं वर्षाला नाही तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ मिळते. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 07:38 AM2017-10-08T07:38:10+5:302017-10-08T07:40:16+5:30

भारतातल्या अशी एका कंपनी आहे तिथं वर्षाला नाही तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ मिळते. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे.

Hey! There was an increase in the salary of every month in the 'company' of India | अरे वा ! भारतातील 'या' कंपनीमध्ये दर महिन्याला होते पगारवाढ

अरे वा ! भारतातील 'या' कंपनीमध्ये दर महिन्याला होते पगारवाढ

Highlightsकामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत.

नवी दिल्ली : सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे वर्षाला होणारी पगारवाढ मिळेलच याची शाश्वती नसते आणि ती मिळालीच तर अगदी तटपुंजी असते. पण भारतातल्या अशी एका कंपनी आहे तिथं वर्षाला नाही तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ मिळते. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे. कामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारवाढ देत आहे.

नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पुर्ण करण्यासाठी कोणतेही दबाव नसणार आहे. कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 

नव्या नियमानुसार, कोका-कोला इंडियाच्या कॉर्पोरेट बिझिनेस युनिटमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे. यामध्ये साधारण 300 सहकारी संस्था आहेत.गेल्या 7 महिन्यांत सुमारे 80 ते 85 मॅनेजर्सनी नव्या सिस्टीमला आत्मसात करत चांगला परफॉर्मन्स दिला आहे. प्रत्येक महिन्यात आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या कामाचा अभिप्रायही दिला जात आहे.

Web Title: Hey! There was an increase in the salary of every month in the 'company' of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.