दारूड्या महिलांचा दक्षिण मुंबईत धिंगाणा

By Admin | Updated: May 24, 2014 05:40 IST2014-05-24T05:37:50+5:302014-05-24T05:40:08+5:30

दक्षिण मुंबईत शुक्रवारी पहाटे दोन दारुड्या महिला चालकांनी भरधाव वेगाने गाडी हाकत मोठा गोंधळ उडवून दिला.

Drunken women in south Mumbai | दारूड्या महिलांचा दक्षिण मुंबईत धिंगाणा

दारूड्या महिलांचा दक्षिण मुंबईत धिंगाणा

मुंबई : दक्षिण मुंबईत शुक्रवारी पहाटे दोन दारुड्या महिला चालकांनी भरधाव वेगाने गाडी हाकत मोठा गोंधळ उडवून दिला. वाहतूक पोलिसांनी सुमारे तासभर केलेल्या पाठलागानंतर त्यांना मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले. प्रिथिका वाधवानी आणि सुजाता नेवर अशी त्यांची नावे आहेत. महात्मा गांधी मार्गावर पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी चारचाकी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव गाडी हाकणार्‍या चालकांनी पोलिसांना न जुमानता गाडी सुसाट हाकली. तेव्हा पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. महात्मा गांधी मार्गावरून सुरू झालेले हे पाठलागनाट्य कर्नाक ब्रिजवरून छत्रपती शिवाजी टर्मिनस मार्गे फोर्टपर्यंत सुरू राहिले. तासभर चाललेल्या या नाट्यानंतर पोलिसांनी वाहन चालवत असलेल्या प्रिथिकासह तिची मैत्रिण सुजातालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघींच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. सेंट जॉर्जेस रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्या दोघीही दारू प्यायल्याचे सिद्ध झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Drunken women in south Mumbai