मद्यपी प्रवाशाचा दंगा आणि न झालेले विमान अपहरण

By Admin | Updated: May 6, 2014 15:39 IST2014-05-06T14:52:32+5:302014-05-06T15:39:23+5:30

इंडोनेशियातील बाली बेटावर जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या व्हजिर्न विमानात एका मद्यपी प्रवाशाने अपहरणाचा इशारा दिला व कॉकपीट फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. हे विमान बाली बेटावर उतरविण्यात आले.

The drunken traveler's riot and unplanned aircraft hijacked | मद्यपी प्रवाशाचा दंगा आणि न झालेले विमान अपहरण

मद्यपी प्रवाशाचा दंगा आणि न झालेले विमान अपहरण

जकार्ता : इंडोनेशियातील बाली बेटावर जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या व्हजिर्न विमानात एका मद्यपी प्रवाशाने अपहरणाचा इशारा दिला व कॉकपीट फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. हे विमान बाली बेटावर उतरविण्यात आले. यामुळे मद्यपी प्रवाशाचा दंगा अन हे विमान अपहरण नाट्य दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले.

ब्रिस्बेन ते बाली मार्गावर हे विमान जात असताना शुक्रवारी हा नाट्यमय प्रकार घडला. ७३७-८00 विमान बाली बेटावर उतरविण्यात आले, त्यावेळी विमानतळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. ब्रिस्बेन ते बाली विमानाचे अपहरण झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. पण व्हजिर्न ऑस्ट्रेलिया कंपनीने नंतर केलेल्या खुलाशानुसार मद्यपानाच्या नशेत असणार्‍या एका प्रवाशाने कॉकपीटच्या दाराला धडक दिल्यामुळे अपहरणाचा अलार्म वाजला. 
इंडोनेशियाच्या अधिकार्‍यांनी नंतर त्याला अटक केली. विमानाचे अपहरण झाले नाही, निरोप देण्यात गडबड झाली असे व्हजिर्न ऑस्ट्रेलियाचे बालीतील अधिकारी हेरू सुडजामिको यांनी सांगितले. अति मद्यपानामुळे, त्याची आक्रमकता वाढली होती, मला मिळालेल्या माहितीनुसार या प्रवाशाने कॉकपीटचे दार लावलेले असताना तसेच आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दाराला धडक बसली; पण त्याला आत जाता आले नाही. विमानातील कर्मचार्‍यांनी त्याला धरले व त्याचे हात बांधून त्याला मागच्या सीटवर बसवले. विमान बाली येथे उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याचवेळी गरुडा हवाई सेवेच्या विमानातून प्रवास करणारे पलानी मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या विमानाच्या वैमानिकाने बाली विमानतळ लॉक करण्यात आल्याचे सांगितले. बाली विमानतळावर अपहरण नाट्य सुरू असल्याने विमानाला कितीही उशीर होईल असेही जाहीर करण्यात आले होते. अपहरण नाट्य चाललेले विमान आमच्यापासून १५0 मीटर अंतरावर होते. तिथे लष्कराच्या गाड्या आलेल्या दिसत होत्या. व्हजिर्न विमानाला सुरक्षा रक्षकांचा वेढा घालण्यात आला, विमान बाजूला घेण्यात आले, त्यानंतर विमान वाहतूक सुरळीत करण्यात आली. (वृत्तसंस्था)

Web Title: The drunken traveler's riot and unplanned aircraft hijacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.