(Image Credit : Evening Express)
संशोधकांनी घोडे आणि गाढवांचा स्वभाव समजून घेण्यासाठी एक रिसर्च केला. या रिसर्चनुसार, घोडे आणि गाढवांचा स्वभाव फार जास्त प्रमाणात विरूद्ध असतात. गाढवांना पाऊस अजिबात आवडत नाही. तर घोड्यांना पाऊस आणि थंडी जास्त पसंत असते. जर्नल ऑफ व्हेटरनरी बिहेविअरमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, घोडा हा जास्तीत जास्त थंडी सहन करण्यात सक्षम असतो.
वादळ आल्यावर गाढवांचं काय होतं?
हा रिसर्च पोर्ट्समाउथ यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी केला आहे. रिसर्चमध्ये २०८ वेगवेगळ्या प्रजातींच्या घोड्यांचा आणि गाढवांचा समावेश करण्यात आला होता. साधारण १६ महिन्यांपर्यंत इंग्लंडच्या समरसेट आणि डेवनमध्ये हा रिसर्च करण्यात आला. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जोरात वारा आला तर गाढवांच्या वागण्यात बराच बदल बघायला मिळतो. अशा स्थितीत ६१ टक्के गाढव घर किंवा कशाचातरी आश्रय घेऊन राहणे पसंत करतात. हेच प्रमाण घोड्यांमध्ये केवळ ५ टक्के आढळलं.
रिसर्चमध्ये अनेक गोष्टींना आधार केलं गेलं. यात तापमान, हवेची गती, पाऊसाचं प्रमाण आणि जनावरांना माशा चावल्याने होणारा त्रास यांचा समावेश होता. सोबतच जनावरांना कोणत्या गोष्टी आश्रय घेण्यास भाग पाडतात, हा भाग सुद्धा रिसर्चमध्ये होता. लंडनसारख्या देशात घोडे सहजपणे जगू शकतात. पण गाढवांसाठी गरम जलवायु असलेले देश चांगले ठरतात.
गाढवांच्या प्रजातींचां संबंध आफ्रिकेशी
अभ्यासक डॉ. प्रूप्स यांनी सांगितले की, वेगाने वारा किंवा पाऊस होत असेल तर गाढव आश्रय शोधू लागतात. यातून त्यांच्या प्रजातींबाबत बरीच माहिती मिळते. सामान्यपणे घोडे अशा ठिकाणी आढळतात, जिथे तापमान फार जास्त नसतं. थंड ठिकाणांवर घोडे अधिक बघायला मिळतात. तेच गाढवांच्या प्रजातीचा संबंध आफ्रिकेत आढळणाऱ्या जंगली गाढवांशी आहे. हे जास्तीत जास्त उत्तर आफ्रिकेतील वाळवटांत बघायला मिळतात. त्यामुळे तापमान वाढल्यावर त्यांना काही त्रास होत नाही. पण असं घोड्यांबाबत नाहीये. या रिसर्चच्या माध्यमातून अभ्यासकांना लोकांना हेही सांगायचं आहे की, घोडे आणि गाढवांच्या प्रजाती चांगल्याप्रकारे सुरक्षित कशा ठेवल्या जाऊ शकता.