शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वळू लाल रंग बघून भडकतात तुम्हालाही असंच वाटतं का? सत्य वाचून बसेल आपल्याला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:27 IST

Interesting Facts : खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून किंवा लाल रंग बघून भडकतात का? खरंतर अनेकांना हा प्रश्न पडला असेल, तर याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोतच.

Interesting Facts : अनेक सिनेमे किंवा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहिलं असेल की, वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तीच्या मागे धावत किंवा लाल रंगाला पाहून हल्ला करतात. काही देशांमध्ये तर याच्या मोठमोठ्या स्पर्धा भरवल्या जातात. ज्यात एक व्यक्ती वळूला लाल रंगाचा कापड धाखवते आणि वळू त्याकडे धावत जातो. पण मुळात हा महत्वाचा प्रश्न आहे की, खरंच वळू लाल कपडे घातलेल्या व्यक्तींना पाहून किंवा लाल रंग बघून भडकतात का? खरंतर अनेकांना हा प्रश्न पडला असेल, तर याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोतच.

खरंच वळू लाल रंग बघून भडकतात का?

आपल्यालाही कधीना कधी हा प्रश्न पडला असेल की, खरंच वळू लाल रंग बघून भडकतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. वळूबाबत अनेकांमध्ये हा एक मोठा गैरसमज आहे. कारण वळूच्या खेळात मेटाडोर आपल्या हातात लाल कपडा घेऊन त्याला खुणावतो आणि आपल्याकडे येण्यास सांगतो. काही सिनेमातही असंच दाखवण्यात आलं आहे. याच कारणाने असं मानलं जातं की, लाल रंग बघून वळू भडकतो. मात्र, यात काहीच तथ्य नाही.

मुळात वळू पार्शिअली कलर ब्लाईंड असतात. त्यांना रंगांची समज नसते. त्यांच्या लाल रिसेप्टरची कमतरता असते. म्हणजे त्यांना लाल रंग स्पष्टपणे दिसतच नाही. ते केवळ पिवळा, हिरवा, निळा आणि जांभळा रंगच बघू शकतात. रेडिनावरील सूक्ष्म कोशिकांमुळेच रंगाची ओळख पटवता येते. अशीच एक सूक्ष्म कोशिका ज्यामुळे लाल रंग ओळखता येतो, ती बैलांमध्ये नसते. हे तर वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट आहे की, वळू लाल रंग बघून भडकत नाही आणि त्यांना लाल रंगही दिसत नाही. वळूच्या खेळात बुलफायटर जेव्हा हातात लाल कपडा घेऊन हलवतो, ती हालचाल पाहून वळू भडकतात.

त्यामुळे वळू लाल रंग बघून किंवा लाल कपडे बघून भडकतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. ते व्यक्तीची हालचाल किंवा व्यवहार पाहून किंवा इन्सिक्युरिटीच्या कारणाने हल्ला करतात. लोकांना वाटतं की, लाल रंगामुळे भडकला असेल, तर हा फक्त एक गैरसमज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Do Bulls Really Get Enraged by Red? The Truth Revealed!

Web Summary : Bulls aren't enraged by the color red. They are partially colorblind and react to movement, not color. Bullfighters' waving capes trigger the animal's aggression, dispelling a common misconception.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके