शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

भारतात दोषीला फाशी देण्याआधी 'गंगाराम'ला फासावर का लटकवतात? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:11 IST

जेलरपासून जल्लादापर्यंत प्रत्येकजण या प्रक्रियेसाठी स्वत:ला मानसिक रूपाने तयार करतात. तुरूंग प्रशासनाकडून जल्लादाला फाशीच्या काही वेळाआधी अल्टीमेटम दिला जातो.

(Image Credit : patrika.com)

भारतात एखाद्या गुन्हेगाराला फाशी देण्याआधीची प्रक्रिया फारच लांबलचक असते. यादरम्यान तुरूंग प्रशासनाला अनेक प्रकारच्या तयारी कराव्या लागतात. जेलरपासून जल्लादापर्यंत प्रत्येकजण या प्रक्रियेसाठी स्वत:ला मानसिक रूपाने तयार करतात. तुरूंग प्रशासनाकडून जल्लादाला फाशीच्या काही वेळाआधी अल्टीमेटम दिला जातो.

२५ ऑक्टोबर १९७८ ला रायपूरच्या तुरूंगात फाशीची प्रक्रिया आपल्या डोळ्याने पाहणारे पत्रकार गिरिजाशंकर यांनी त्यांचं पुस्तक 'आंखों देखी फांसी' मध्ये लिहिलं की, मी रायपूरच्या तुरूंगा 'बैजू' नावाच्या दोषीला देण्यात आलेली फाशीची प्रक्रिया पाहिली होती. यादरम्यान बैजूच्या फाशीसाठी एक लाकडाचा पुतळा तयार केला होता, ज्याचं नाव  'गंगाराम' ठेवलं होतं.

यादरम्यान जेव्हा तुरूंग प्रशासनाला विचारण्यात आलं की, पुतळ्याचं नाव 'गंगाराम' हेच का ठेवलं गेलं. तर यावर तुरूंगाचे अधीक्षक म्हणाले होते की, ही प्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे. भारतात कोणत्याही मृतकासाठी भगवान राम आणि गंगाजलाचं फार महत्व मानलं जातं. त्यामुळे पुतळ्याचं नाव 'गंगाराम' ठेवलं गेलं होतं. (हे पण वाचा : ब्लू व्हेलच्या हृदयाचं वजन किती असतं? आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी...)

दोषीआधी गंगारामला का फाशी दिली जाते?

भारतात कोणत्याही दोषीला फाशी देण्याआधी एका पुतळ्याला फाशी दिली जाते. याच पुतळ्याचं नाव गंगाराम असतं. दोषीला फाशी देण्याआधी दोरी चेक करण्यासाठी गंगारामला फाशी दिली जाते. या पुतळ्याचं वजन दोषीच्या वजनापेक्षा दीड पटीने जास्त असतं. डमीची फाशी यशस्वी झाल्यानंतर त्याच दोराने आणि ड्रिलनुसार खऱ्या दोषीला फाशी दिली जाते.

कशी असते फाशीची प्रक्रिया?

तुरूंगाच्या मॅन्युअलनुसार, कोणत्याही गुन्हेगाराला फाशी सूर्योदयानंतरच दिली जाते. सामान्यपणे उन्हाळ्यात सकाळी ६ वाजता आणि हिवाळ्यात सकाळी ७ वाजता फाशी दिली जाते. फाशी घरात आणल्यावर आधी दोषीला सकाळी ५ वाजता आंघोळ घालवली जाते. त्यानंतर त्याला नवे कपडे दिले जातात. नंतर चहा दिला जातो. दोषीला नाश्त्यासाठी विचारलं जातं. त्याने मागितला तर दिला जातो. (हे पण वाचा : एक असं गाव जिथे कधीच पाऊस पडत नाही, कारण वाचून व्हाल अवाक्...)

यानंतर मॅजिस्ट्रेट दोषीला त्याची शेवटची इच्छा विचारतात. नंतर दोषीला काळा मास्क लावून आणि त्याचे हात मागे बांधून त्याला फाशी दिली जाते. हे सगळं काम जल्लाद करतो. फाशी देताना कोणताही आवाज होऊ नये यासाठी पूर्ण बंदोबस्त केला जातो. जेव्हा फाशी देण्याची वेळ येते तेव्हा इशारा देण्यासाठी एक रूमाल खाली पाडला जातो आणि जल्लाद लिव्हर खेचतो. ही सगळी कामे इशाऱ्यात केली जातात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके