शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रेल्वेच्या डब्यांवरील 'या' ५ आकड्यांचा अर्थ काय असतो? 99 टक्के लोकांना नसेल माहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 18:25 IST

तुम्ही अनेकदा रेल्वेच्या डब्यावर लिहिलेला 5 अंकी कोड पाहिला असेलच, पण त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत नसेल. या कोडमध्ये काही रहस्य असतात. तेच जाणून घेऊ.

भारतात रोज लाखो लोक रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा एक वेगळाच अनुभव देणारा असतो. स्वस्त आणि मस्त प्रवासासाठी भारतीय रेल्वे ओळखली जाते. म्हणून भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाईन म्हटलं जातं. रेल्वेने लाखो लोक प्रवास करतात, पण त्यांना रेल्वेबाबत अनेक गोष्टी माहीत नसतात. आज अशाच एका गोष्टीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही अनेकदा रेल्वेच्या डब्यावर लिहिलेला 5 अंकी कोड पाहिला असेलच, पण त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत नसेल. या कोडमध्ये काही रहस्य असतात. तेच जाणून घेऊ.

रेल्वेच्या डब्यावरील 5 डिजिटच्या या कोडमध्ये बरीच माहिती लपलेली असते. यात बोगीबाबत, त्याचं निर्माण कधी झालं याची माहिती आणि कोचच्या प्रकाराबाबत माहिती दडलेली असते. 5 मधील पहिले दोन नंबर दर्शवतात की, कोच कोणत्या वर्षात तयार करण्यात आला होता. तेच शेवटचे तीन नंबर सांगतात की, कोच कोणत्या प्रकारचा आहे.

पहिल्या दोन कोडचा अर्थ

डब्यावरील कोडमधून जर तुम्हाला कोचबाबत माहिती काढायची असेल तर याला दोन भागात विभागून बघा. जसे की, कोचचा नंबर जर 00296 आहे हा नंबर 00 आणि 296 असा डिवाइड करा. पहिल्या दोन कोडचा अर्थ आहे की, हा कोच साल 2000 मध्ये तयार करण्यात आला. जर एखाद्या कोचवर 95674 असा कोड लिहिला असेल तर याचा अर्थ कोचचं निर्माण 1995 मध्ये झालं आहे.

नंतरच्या 3 कोडचा अर्थ

पाचपैकी शेवटच्या तीन नंबरवरून कोचचा प्रकार जाणून घेता येतो. जर एखाद्या कोचचा नंबर 00296 असेल तर याचा दुसरा भाग 296 हे दर्शवतो की, डब्बा स्लीपर कोच आहे. जर कोचचा नंबर 95674 तर याचा अर्थ हा आहे की, कोच सेकंड क्लास सीटिंग/ जन शताब्दी चेअर कार आहे.

नंबर आणि त्यांचा अर्थ

001-025    एसी फर्स्ट क्लास026-050    कंपोजिट (1AC + AC-2T)051-100    एसी-टू टियर101-150    एसी- थ्री टियर151-200    सीसी (एसी चेयर कार)201-400    स्लीपर (सेकंड क्लास स्लीपर)401-600    जनरल सेकंड क्लास601-700    सेकंड क्लास सीटिंग/जन शताब्दी चेयर कार701-800    सीटिंग कम लगेज रॅक801+    पॅंट्री कार, जनरेटर आणि मेल

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स