तुम्ही व्यंगचित्र काढता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी...
By Admin | Updated: January 25, 2016 12:33 IST2016-01-23T09:44:15+5:302016-01-25T12:33:12+5:30
प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ.

तुम्ही व्यंगचित्र काढता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ.
तर उचला तुमचा ब्रश किंवा पेन-पेन्सिल आणि काढा एखादं बोलकं व्यंगचित्र आणि पाठवा onlinelokmat@gmail.com वर ! विजेत्यांना हक्काचं व्यासपीठ तर मिळेलच, पण त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे लोकमतमधून प्रसिध्दी मिळून हजारोंच्या संख्येनं हशा आणि टाळय़ांची दादही मिळेल. स्पर्धा सोप्पी आहे. तुम्ही एवढंच करायचं.. एक व्यंगचित्र काढून, स्कॅन करून ते onlinelokmat@gmail.com या इमेल आयडीवर पाठवायचं.
कार्टून काढण्यासाठी कुठल्याही विषयाचं बंधन नाही. एका गोष्टीचं भान जरूर बाळगा, ते म्हणजे कार्टूनला समर्पक कॅप्शन देण्याचं!
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा