शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

न धुता तुम्हीही वर्ष वर्ष वापरता का कपडे?..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:01 IST

पाश्चात्य देशात सध्या ‘नो वॉश’ मुव्हमेंट वेगानं जोर पकडते आहे.

तुम्ही रोज अंघोळ करता? - बहुतेक करत असाल.. पण तुम्ही रोज कपडे बदलता? रोज कपडे धुता? किंवा अंगावरचे कपडे तुम्ही किती वेळा वापरता? किती वेळा वापरल्यानंतर मग धुता? आणि समजा जिन्स असेल तर? - तिचा किती वेळा तुम्ही पिट्ट्या पाडता?  किती वेळ ती पिदडता? न धुताच किती वेळा वारंवार वापरता?.. आणि समजा अंडरगारमेंट असेल तर?..

- आता तुम्ही म्हणाल, आमच्या कपड्यांशी आणि आमचे कपडे न धुता किती वेळा आम्ही वापरतो, याच्याशी तुमचा काय संबंध? - तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, पण सध्या कपडे न धुता वापरण्याचा फार मोठा ट्रेंड जगभरात आला आहे, त्यामुळेच उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही..पाश्चात्य देशात सध्या ‘नो वॉश’ मुव्हमेंट वेगानं जोर पकडते आहे. पण आहे तरी काय ही चळवळं?..एक उदाहरण सांगतो.. ‘इंडिगो इन्व्हिटेशनल’ आणि ‘द रिबेल्स वॉर्डरोब’चे संस्थापक ब्रायन साबो ही एक जगप्रसिद्ध हस्ती. ते कंटेण्ट क्रिएटर आहेत, व्यावसायिक लेखक आहेत, संपादक आहेत, संशोधक आहेत.. तब्बल १३ वर्षांपूर्वीची म्हणजे २०१०ची गोष्ट. डेनिम जीन्स पँटची एक जोडी त्यांनी खरेदी केली आणि कॅनडा ते युरोप टूरवर ते फिरण्यासाठी निघाले. सहा महिन्याच्या या टूरमध्ये त्यांनी आपली जीन्स पँट एकदाही धुतली नाही. बुडापेस्ट येथे आपल्या भावी बायकोची त्यांनी भेट घेतली. त्यांची ही मैत्रीण त्यांच्या रुमवर आली, तेव्हा न धुता वारंवार वापरलेली आपली जीन्स त्यांनी अशीच जमिनीवर फेकलेली होती. मैत्रीण आलेली पाहताच त्यांनी जमिनीवर पडलेली ती जीन्स झटक्यात उचलली आणि बेडच्या एका कोपऱ्यात घडी घालून ठेवून दिली. त्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं, मी खरंच भाग्यवान होतो, कारण तिला माझ्या ‘खुशबूदार’ जीन्सपेक्षा माझ्यात जास्त इंटरेस्ट होता! 

जगप्रसिद्ध ब्रिटिश फॅशन डिझायनर स्टेला मॅकार्टनीचं उदाहरण घ्या.. २०१९मध्ये तिनं एक विधान केलं होतं. तिच्या या विधानामुळे ती जगभरात एकदम चर्चेत आली होती. त्यावेळी स्टेला म्हणाली होती, हा तर थंब रुल आहे की, एखादी गोष्ट जर वारंवार साफ, स्वच्छ करायची गरज नसेल तर मुद्दाम जाणीवपूर्वक ती स्वच्छ करू नका. उदाहारणार्थ.. मी माझी ब्रा रोज बदलत नाही, कारण ती रोज बदलण्याची गरज नाही.. कपडे एकदा घालून झालेत म्हणजे लगेच ते वॉशिंग मशीनमध्ये फेकले पाहिजेत असं नाही.. मी स्वत: वैयक्तिकरित्या अतिशय स्वच्छ राहाते, पर्सनल हायजिनची मी अत्यंत काटेकोरपणे काळजी घेते, पण वारंवार ड्राय क्लिनिंग आणि गरज नसताना कपडे धुण्याच्या मी विरुद्ध आहे!..

ही झाली केवळ दोन उदाहरणं. पण अंगात घातलेले कपडे न धुता वारंवार वापरण्याचा ट्रेंड आता जभरातच पॉप्युलर होतो आहे. अनेक मोठमोठ्या हस्ती त्यात अग्रभागी आहेत. आणि ‘नो वॉश क्लब’मध्ये ते हिरिरीनं सामील झाले आहेत!.. काही काही जण तर तब्बल वर्ष वर्ष कपडे धुवत नाहीत. वॉशिंग मशीनचाही वापर करीत नाहीत.पण, अंगावरचे कपडे वारंवार का बदलायचे नाहीत? महिनोन्महिने ते का धुवायचे नाहीत? याबाबत या लोकांचं काही म्हणणंही आहे. स्टेला मॅकार्टनी म्हणते, ज्यावेळी मी लंडनमध्ये ‘सेविल रो’ या कपड्यांच्या ब्रॅण्डसोबत काम करत होते, त्यावेळी मला कळलं, की कपडे वारंवार धुण्याची काहीच गरज नसते. कपडे फक्त वाळत टाकायचे आणि झटकून घ्यायचे की झालं काम! तेवढं केलं तरी पुरेसं आहे. यामुळे कपडे तर दीर्घकाळ चांगले राहातातच, आपले पैसे वाचतात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसानं आपल्या बाजूनं उचललेलं हे पहिलं पाऊल ठरू शकतं!..‘नो वॉश क्लब’मध्ये अनेक लोक तर सामील होत आहेतच, पण आपले कपडे वारंवार धुऊ नका, ते फक्त वाळत घाला, झटका आणि पुन्हा वापरा.. असा संदेश देत, त्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचं कामही हा क्लब, अशाच तऱ्हेच्या अनेक संस्था आणि सेलिब्रिटीजदेखील करीत आहेत.

‘अंडरगारमेंटही वारंवार धुवू नका!’ स्टेला मॅकार्टनीचं म्हणणं आहे, महिलांनीही आपल्या अंडरगारमेंटकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हे कपडे वारंवार धुण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्लास्टिक सोप फाउंडेशन ॲडव्होकसी ग्रुपशी संलग्न लॉरा डियाज सांचेज म्हणते, आपण जितक्या जास्त वेळा कपडे धुऊ, तितके जास्त मायक्रोफायबर्स वातावरणात सोडले जातात. ज्या ज्या वेळी आपण कपडे धुतो, त्या त्या वेळी तब्बल ९० लाख मायक्रोफायबर्स वातावरणात मिसळतात. यामुळे कपड्यांची तर वाट लागतेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणाचं अतिशय नुकसान होतं!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेWorld Trendingजगातील घडामोडी