ग्लॅमरस तरुण आजीची सोशल मीडियावर चर्चा
By Admin | Updated: March 27, 2017 01:11 IST2017-03-27T01:11:58+5:302017-03-27T01:11:58+5:30
जगातील ही सगळ््यात तरूण, ग्लॅमरस आजी असावी. झॅकलिना असे या फॅशन ब्लॉगर आजीचे नाव असून वय ४७ वर्षे आहे

ग्लॅमरस तरुण आजीची सोशल मीडियावर चर्चा
जगातील ही सगळ््यात तरूण, ग्लॅमरस आजी असावी. झॅकलिना असे या फॅशन ब्लॉगर आजीचे नाव असून वय ४७ वर्षे आहे. ती मूळची सर्बियाची. सध्या ती सोशल मिडियावर स्टार बनली आहे. भलेही ती दोन नातवंडांची आजी असली तरी ‘रियलफॅशनिस्ट’ नावाने सोशल मिडियावर ती आपल्याच तोऱ्यात वावरत असते. ती खूप छान छान कपडे घातलेले स्वत:चे फोटो सोशल मिडियावर टाकते व तिचे चाहते त्यांचे अनुकरण करतात. एखाद्या उत्तम खेळाडूसारखी तिचे शरीर असून तिचे वावरणे, तिची स्टाईल यांचा तिच्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्यांना खूप हेवा वाटतो. फॅशन ब्लॉगर म्हणून ती झपाटल्यासारखे काम करते.
ती म्हणते की मी माझ्या फॅशन टिप्स या स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि पोलंड देशातून घेते. सध्या ती युरोपची फॅशन हब असलेल्या इटालीत वास्तव्यास आहे. ती तिचे प्रत्येक छायाचित्र ‘ग्रँडमदरदॅटलव्हफॅशन’ या हॅशटॅगने पोस्ट करते व तिला १५७००० फालोअर्स आहेत.