शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

भांडणाला कंटाळून पळून गेलेला 'तो' अखेर कोरोनाच्या भीतीनं २० वर्षांनी परतला; पत्नी म्हणाली......

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 19:51 IST

कौटुंबिक  कलहांमुळे पळून गेलेला एक माणूस तब्बल २० वर्षांनी आपल्या घरी परत  आला आहे. या माहामारीने कुटुंबापासून दूर असलेल्या या व्यक्तीची कुटुंबाशी भेट घडवली आहे. 

कोरोनाच्या माहामारीनं व्यापक रूप घेतलेलं आहे. अचानकपणे आलेली ही माहामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आला आहे. कोरोनाकाळात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी काही ठिकाणी सकारात्मक घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या माहामारीत कौटुंबिक  कलहांमुळे पळून गेलेला एक माणूस तब्बल २० वर्षांनी आपल्या घरी परत  आला आहे. या माहामारीने कुटुंबापासून दूर असलेल्या या व्यक्तीची कुटुंबाशी भेट घडवली आहे. 

सन २००० मध्ये धनबादच्या झरियामध्ये ही घटना घडली होती. लिलोरी पथरा या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सत्य नारायण यादव यांचे वय ५५ वर्ष आहे. कुटुंबात वाद झाल्यामुळे हा व्यक्ती घर सोडून पळून गेला होता. त्यानंतर आसपासच्या गावात भाड्यानं घर घेऊन हा माणूस एकटाच राहत होता. बेपत्ता झाल्यानंतर या व्यक्तीच्या पत्नीचे  पोलिसात तक्रारही दाखल केली होती. पण प्रयत्न करूनही या व्यक्तीचा काही पत्ता लागत नव्हता.

घरातून पळून गेल्यानंतर सत्य नारायण यादव हे वजन मोजण्याचं मशीन घेऊन लोकांचे वजन मोजण्याच काम करत होते. पण मागील आठवड्यात त्यांची प्रकृती बरी नव्हती.  सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं दिसून येत होती. म्हणून ते बाहेर न जाता काही दिवस घरीच होते.  कोरोनाच्या माहामाहारीत अशी लक्षणं दिसून आल्यामुळे ग्रामीण लोकांना भय खूप सतावत होते. गावातील लोकांनी विचारणा केल्यास माझं कोणतीही नसून मी एकटा राहत असल्याचे या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर या व्यक्तीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी धमकावून विचारल्यानंतर या व्यक्तीनं आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिली  रडू लागला.

त्यांनी पोलिसांना सांगितले की, '' माझं नाव सत्य नारायण यादव नसून गजाध सोनार आहे.  सन २००० मध्ये घरगुती भांडणामुळे मी घर सोडून निघून आलो. मी बेल गड झुमरी तलैया, कोडरमा जिल्ह्यातील रहिवासी आहे. १९८५ ते २००० पर्यंत मी इंटरप्राइजेज मेडिकलमध्ये काम केलं. दरम्यान कुटुंबात भांडणं झाल्यानं मी घर सोडून निघून आलो.''

पोलिसांनी सुचना दिल्यानंतर या सदर व्यक्तीची पत्नी अनीतादेवी आणि मुलगा चंदेश्वर हे  पोलीस स्थानकात पोहोचले. अनेक वर्षानी पतीला पाहिल्यानंतर पत्नीला रडू कोसळले.  पोलिसांना अनीतादेवी यांनी सांगितले की, ''पती बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार दिली होती.  तसंच खूप ठिकाणी शोध घेतला. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. पण आता मी खूप खुश आहे.''  या शब्दात अनितादेवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .

हे पण वाचा :

बोंबला! घरामागच्या विहिरीत अडकला हा लठ्ठ माणूस, १२ लोक मिळूनही काढू शकले नाही बाहेर!

अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं

कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटकेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या