शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

Viral Video: बाबो! घोडी नाही तर गाढवावरून काढली नवरदेवाची वरात, नातेवाईकांचा कल्ला डान्स....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 15:32 IST

Viral Video : नवरदेव गाढवावर मस्त बसलाय आणि त्याचे नातेवाईक डान्स करत आहेत. यादरम्यान एक महिला आकाशाकडे नोटा भिरकावताना सुद्धा दिसत आहे. 

मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील एक अजब व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इथे एका नवरदेवाला घोडी मिळाली नाही म्हणून त्याची वरात गाढवावरून काढण्यात आली. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, नवरदेव गाढवावर मस्त बसलाय आणि त्याचे नातेवाईक डान्स करत आहेत. यादरम्यान एक महिला आकाशाकडे नोटा भिरकावताना सुद्धा दिसत आहे. 

ही घटना देवास जिल्ह्यातील करोंदिया गावातील आहे. देवासपासून साधारण ८० किमीवर हे गाव आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांनी यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी लिहिले की, घोडी मिळाली नाही तर गाढवावर बसून आपलं काम भागवलं. तसेच अशीही माहिती मिळत आहे की, या गावातील नवरदेव नवरीला आणायला गाढवावर बसूनच जातो. या गावाची तशी परंपराच आहे. (हे पण वाचा : क्या बात! काठ्यांच्या मदतीने नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले हार, सोशल मीडियातून प्रशंसा...)

दरम्यान देवासमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत आहे. इथे कर्फ्यू लावण्यात आला असून लग्नासाठी केवळ १० सदस्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोक काही ऐकत नाहीयेत. हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र, व्हिडीओमुळे लोकांचं जबरदस्त मनोरंजन होत आहे.

रायसेनमधील घटनेची चर्चा

रायसेनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मध्य प्रदेशच्या सिलवानीची ही घटना आहे. कोरोना कर्फ्यूच उल्लंघन केल्याप्रकरणी चालान कापण्यासाठी गेलेल्या मुख्य नगर परिषद अधिकाऱ्याने एका ठेलेवाल्याला कानशीलात लगावली होती. इतकंच नाही तर त्यांनी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMadhya Pradeshमध्य प्रदेश