हेल्मेटमुळे होणाऱ्या गरमीमुळे हेल्मेट वापरणं टाळत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बाजारात अनेक अनोखं डिवाइस आलं आहे. हे डिवाइस हेल्मेटला जोडल्यावर तुम्ही हेल्मेट वापरण्याला टाळाटाळ करणार नाहीत. कारण शरीराची लाहीलाही करुन सोडणाऱ्या उन्हाळ्यातही या याने तुमचं डोकं थंड राहणार. हे डिवाइस फारच यूनिक प्रकारे काम करतं. या डिवाइसमध्ये असं म्हणूया की, एक छोटा AC बसवण्यात आला आहे. 

गरमी आणि प्रदूषणापासून बचाव करणारा कूलर

या प्रॉडक्टचं नाव आहे BlueSnap2, हे प्रॉडक्ट बंगळुरुच्या एका कंपनीने तयार केलं आहे. हे डिवाइस हेल्मेटला अटॅच केल्यानंतर डोकं तर थंड राहिलच सोबतच तुमचा प्रदूषणापासूनही बचाव होईल. कारण यात एक एअर फिल्टर लावण्यात आलं आहे. याआधी कंपनीने एक BlueSnap प्रॉडक्ट लॉन्च केलं होतं. त्यात काही बदल करुन त्यांनी BlueSnap2 हे आणलं आहे. 

एअर कूलरची खासियत

या डिवाइसमध्ये एक छोटा पंखा लावण्यात आला आहे. हा पंखा ताजी हवा शोषूण स्वच्छ आणि थंड करतो. त्यानंतर तो हवा हेल्मेटमध्ये दाखल होऊ  देतो. म्हणजे कितीही तापमान वाढलं तरी तुम्हाला थंड वाटणार. या कूलरमध्ये फोम आधारित फिल्टर लावण्यात आलं आहे. ज्यामुळे कूलरचं पाणी जास्त वेळ चालतं. या कूलरची किंमत २, २९९ रुपये इतकी आहे. 

१० सेकंदात थंडा थंडा कूल कूल

सर्वात खास बाब म्हणजे हा कूलर केवळ १० सेकंदात गरम वातावरणात हेल्मेटला थंड करतो. इतकेच नाही तर बॅटरीवर चालणारा हा कूलर तुम्हाला कारचं फिलिंग देईल. म्हणजे धूळ-माती आत पोहोचणार नाही.  यातील बॅटरी तुम्ही यूएसबी केबलच्या मदतीने चार्ज करु शकता. एकदा चार्ज केल्यावर बॅटरी १० तास चालते. 

Web Title: Detachable AC cooler helmets blusnap2 for two wheeler riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.