शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'एप्रिल फूल' करत पोलिसांनी पकडला अट्टल एटीएम चोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:58 IST

चोराला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची युक्ती

नवी दिल्ली: एटीएमचोराला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अजब युक्ती केली. चोराला पकडण्यासाठी पोलीस स्वत: चोर झाले आणि 'ऑपरेशन एप्रिल फूल' सुरू करण्यात आलं. या ऑपरेशन अंतर्गत पोलिसांनी चोराची सर्व गुपितं, आडमार्ग जाणून घेतले आणि योग्य संधी मिळताच 'एप्रिल फूल' म्हणत त्याला बेड्या ठोकल्या.दिल्ली पोलीस दलातील निरीक्षक नवीन मलिक यांनी 'ऑपरेशन एप्रिल फूल' यशस्वी केलं. यासाठी पोलीस दलातील सात जणांनी कुर्ता आणि लुंगी परिधान केली. हे सर्व पोलीस 45 वर्षांच्या अस्लमला पकडण्यासाठी सज्ज झाले. आपण चोरच असल्याचं भासवत हे सर्व जण अस्लमच्या टोळीत सामील झाले. यानंतर एटीएम कसं पळवायचं, पकडलो गेल्यास सहजपणे जामीन कसा मिळवायचा, याबद्दलचं सर्व कौशल्य अस्लमनं त्यांना शिकवलं. अस्लमकडून आवश्यक माहिती मिळाल्यावर अचानक हेड कॉन्स्टेबल 'एप्रिल फूल' ओरडला आणि त्याच्या साथीदारांनी लगेचच अस्लमला अटक केली. अस्लमनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी ठरलो, अशी माहिती द्वारकाचे पोलीस उपायुक्त अँटो अल्फोन्स यांनी दिली. अस्लमनं आतापर्यंत राजस्थान, कर्नाटक आणि कानपूरमधील एटीएम पळवल्याचं पोलिसांनी सांगितलं. अस्लमची एक टोळी यामध्ये सक्रिय असल्याचंही ते म्हणाले. 'एटीएम दोन प्रकारे लावण्यात येतं. एका प्रकारात एटीएम नट बोल्टच्या मदतीनं जमिनीला लावलं जातं. तर दुसऱ्या प्रकारात शक्तीशाली गमच्या मदतीनं जमिनीला चिकटवण्यात येतं. यातील दुसऱ्या प्रकारातलं एटीएम पळवणं थोडं सोपं असतं,' अशी माहिती पोलिसांनी दिली. अस्लम कशा पद्धतीनं एटीएम पळवायचा, याची माहितीदेखील यावेळी पोलिसांनी सांगितली. 'फॉर्च्युनर गाडी घेऊन आलेली एखादी व्यक्ती एटीएम घेऊन पळून जाईल, अशी कल्पना कोणीही करणार नाही. अस्लम याचाच फायदा घ्यायचा. तो अवघ्या काही सेकंदांमध्ये एटीएमच्या भोवती एक बेल्ट लावायचा आणि मेकशिफ्ट पुलीच्या मदतीनं एटीएम खेचायला सुरुवात करायचा. यानंतर कारचा ऍक्सिलेटर देऊन एटीएम पळवायचा,' असं पोलिसांनी सांगितलं.  

टॅग्स :PoliceपोलिसatmएटीएमThiefचोर