69 मुलांना जन्म देण्याचा विक्रम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: March 2, 2017 23:53 IST2017-03-02T23:53:22+5:302017-03-02T23:53:22+5:30

जगात सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम कुणाच्या नावे आहे, या प्रश्नाचे उत्तर कदाचित तुम्हाला माहित

Death of a woman who gave birth to 69 children | 69 मुलांना जन्म देण्याचा विक्रम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

69 मुलांना जन्म देण्याचा विक्रम करणाऱ्या महिलेचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत 
गाझापट्टी (पॅलेस्टाइन), दि. 2  - जगात सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा विक्रम कुणाच्या नावे आहे, या प्रश्नाचे उत्तर कदाचित तुम्हाला माहित नसेल. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 69 मुले जन्माला घालण्याचा विक्रम एका महिलेच्या नावे आहे. या विचित्र विक्रमाची बरोबरी करणाऱ्या पॅलेस्टिनी महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
प्रसारमाध्यमातून येत असलेल्या वृत्तांनुसार 69 मुलांना जन्म देणाऱ्या या महिलेचा गाझापट्टी येथे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या पतीनेसुद्धा तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  या महिलेने आपल्या जीवनात 16 जुळी मुले, 7 तिळी मुले तर चार वेळा प्रत्येकी चार मुलांना जन्म दिला होता. अशाप्रकारे या महिलेने आपल्या मृत्यूपूर्वी 69 मुलांना जन्म दिला होता. मात्र खलिल टाइम्सने केलेल्या दाव्यानुसार खूप मुलांना जन्म देण्याचा हा काही पहिलाच नाही. याआधी रशियातील एका महिनेसुद्धा 69 मुलांना जन्म दिला होता. 

Web Title: Death of a woman who gave birth to 69 children