विमान प्रवासादरम्यान सहप्रवाशाला चावल्यावर प्रवाशाचा मृत्यू
By Admin | Updated: October 20, 2015 16:15 IST2015-10-20T13:23:28+5:302015-10-20T16:15:33+5:30
विमान प्रवासादरम्यान सह प्रवाशाला चावा घेतल्यावर २४ वर्षीय ब्राझिलियन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

विमान प्रवासादरम्यान सहप्रवाशाला चावल्यावर प्रवाशाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
डबलिन, दि.२० - विमान प्रवासादरम्यान सह प्रवाशाला चावा घेतल्यावर २४ वर्षीय ब्राझिलियन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने आयर्लंडमधील पोलिसही चक्रावून गेले असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
ब्राझिलमधील एक तरुण एअर लिंगसच्या विमानाने पोर्तूगालमधून आयर्लंडमधील डबलिनच्या दिशेने घेतला. मात्र प्रवासा दरम्यान तो तरुण सहप्रवाशाला चावला. काही वेळाने त्या तरुणाची प्रकृती खालावली व आयर्लंडमधील कॉर्क येथील विमानतळावर विमानाचे आपात्कालीन लँडिग करावे लागले. त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आयर्लंडमधील पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून पोलिसांनी या तरुणासोबत प्रवास करणा-या ४४ वर्षाच्या महिलेलाही अटक केली आहे. या महिलेकडे पोलिसांना अंमलीपदार्थ आढळले आहेत.