शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ज्याला मृत समजलं तो रस्त्यावर फिरताना दिसला, कोरोना काळात झाली १६ वर्षाआधी बेपत्ता झालेल्या भावाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 11:19 IST

पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.

कोरोना काळात बहुतेक परिवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मात्र, या काळातही एका परिवाराच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. कारण  १६ वर्षापूर्वी हरवलेला घरातील सदस्या अचानक सापडला. ही घटना मध्य प्रदेशच्या बैतूलमधील आहे. येथील एक व्यक्ती मानसिक आजारी आहे आणि तो कुठेही फिरत होता. पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली तर समजलं की, तो कटनी जिल्ह्यातील राहणाारा आहे आणि १६ वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याच्या परिवाराचा शोध लावला आणि त्यांना संपर्क केला. परिवारातील लोकही त्याला घेण्यासाठी लगेच आले आणि त्याला घेऊन गेले.

घरातील लोक इतकी वर्ष त्याला मृत समजत होते. त्या व्यक्तीची बुधवारी  बैतूल पोलिसांनी परिवारासोबत भेट घडवून आणली. ही व्यक्ती बेवारसपणे कुठेही रस्त्यांवर फिरत राहत होती. बैतूलच्या चक्कर रोडवर जेव्हा ४५ वर्षीय व्यक्तीसोबत पोलीस बोलले तर तो कटनी जिल्ह्यातील राहणारा असल्याचं समजलं.  त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मात्र, त्याला घराचा पत्ता लक्षात होता. जेव्हा त्याच्या गावात संपर्क केला गेला तर समजलं की, तो १६ वर्षांपासून गायब आहे. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर तो परिवाराला पुन्हा भेटू शकला. 

सुरेश पटेल असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा फोटो जेव्हा परिवाराला दाखवण्यात आला तेव्हा एका क्षणात त्याला ओळखलं गेलं. त्याची बहीण अंजू त्याला घेण्यासाठी बैतूला पोहोचली तर तिच्यावर भाऊ पुन्हा भेटल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

असे सांगितले जात आहे की, सुरेशचं पत्नी आणि सासरच्या लोकांसोबत पैशांच्या देवाण-घेवाणीवरून भांडण झालं होतं. तेव्हा त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यानंतर तो घर सोडून गेला. खूपदा शोध घेऊनही तो कुणाला सापडला नाही. दोन मुलांचा वडील सुरेश १६ वर्षांपासून इकडे-तिकडे भटकत होता. मानसिक स्थिती ठीक नसल्याने घरीही पोहोचू शकत नव्हता. काही महिन्यांनी घरातील लोकांनी त्याला मृत समजलं आणि त्याचा शोध थांबवला. 

पोलिसांच्या मदतीने त्याची बहीण अंजू पटेल त्याला घ्यायला आली तर ती भावाला बघून भावूक झाली. महिला आपल्या भावाला घेऊन गावी गेली. अंजू पटेल म्हणाली की, हा आमचा मोठा भाऊ आहे. १६ वर्षांपासून बेपत्ता होता. सासरी पैशांवरून वाद झाला होता. त्याला मारहाण केली होती. त्यात त्याची मानसिक स्थिती बिघडली. आम्ही त्यांचा खूप शोध घेतला. पण सापडला नाही. आज बैतूल पोलिसांमुळे भाऊ भेटला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशJara hatkeजरा हटके