शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 10:28 IST

इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं.

(Image Credit : Aajtak)

कोरोनाच्या थैमानात अनेक विचित्र किंवा अविश्वसनीय घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणांहून आधी मृत घोषित केलेले अनेक लोक ऐन चितेवर टाकल्यावर जिवंत झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. इथे गुरूवारी चितेवरील एक मृतदेह अचानक उठून बसला आणि आवाज करू लागल्याने एकच गोंधळ उडाला. यानंतर ड़ॉक्टरांना बोलवण्यात आलं.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, स्मशानभूमीत डॉक्टर पोहोचले आणि अॅम्बुलन्सही. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केलं. पण तरीही परिवारातील लोक मानायला तयार नव्हते. ते मृत व्यक्तीला पुन्हा जिल्हा रूग्णालयात घेऊन गेले. तिथेही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हे पण वाचा : बेटा अज्जू, चाय पिला दे....; मृत आजी अचानक बोलू लागली; सगळ्यांची उडाली घाबरगुंडी)

ही घटना अशोक नगरमधील आहे. अनिल जैन नावाच्या व्यक्तीची तब्ये बिघडल्याने त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. साधारण १५ दिवसांपासून तो हॉस्पिलमध्ये भरती होता. मृतकाच्या भावाने सांगितलं की, त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि गुरूवारी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पण जेव्हा आम्ही त्याला स्मशानभूमीत घेऊन गेलो तेव्हा त्याच्या शरीरात हालचाल झाली आणि ओम, ओम असा आवाजही आला. इतकंच नाही तर तो चितेवरून उठून बसला.

त्यानंतर तिथे डॉक्टरांची टीम आली. त्यांनी अनिल जैनला मृत घोषित केलं. कुटुंबियांनी आरोप केला आहे की, जिल्हा हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्ती जिवंत होता. कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनावर बेजबाबदारपणाचे आरोप लावले आहेत. 

तेच सिव्हिल सर्जन म्हणाले की, हे चुकीचं सांगणं आहे की, तो जिवंत आहे. मृतकाला स्मशानभूमीतून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणल्यावरही चेक केलं गेलं. तेव्हाही ती व्यक्ती मृत होती. कुटुंबियांनी लावलेले आरोप निराधार आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या