न्यायालये होणार ठंडा ठंडा कूल कूल!

By Admin | Updated: May 8, 2015 01:59 IST2015-05-08T01:59:58+5:302015-05-08T01:59:58+5:30

जिल्हा न्यायालयांमध्ये भर उन्हाळ्यातही साध्या पंख्यावर कामकाज केले जाते. लवकरच जिल्हा न्यायालयांमधील वातावरण थंड होणार आहे

Courts will cool cold cool! | न्यायालये होणार ठंडा ठंडा कूल कूल!

न्यायालये होणार ठंडा ठंडा कूल कूल!

नागपूर : जिल्हा न्यायालयांमध्ये भर उन्हाळ्यातही साध्या पंख्यावर कामकाज केले जाते. लवकरच जिल्हा न्यायालयांमधील वातावरण थंड होणार आहे. राज्यातील २६ जिल्हा न्यायालयांमध्ये डेझर्ट कूलर लागणार आहेत. राज्य शासनाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती दिली.
राज्य शासनाने यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘जीआर’ जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाने जिल्ह्णात नेमून दिलेल्या एजन्सीतून कूलर्स खरेदी होईल. संबंधित न्यायालयांच्या कार्यालयीन निधीतून कूलरचा खर्च करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Courts will cool cold cool!