शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शिमला मिरची कापताना आवाज आला डराव डराव; महिलेला प्रश्न पडला आता काय कराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:23 IST

धक्कादायक घटनेची कृषी मंत्रालयाकडून गंभीर दखल; घटनेचा तपास सुरू

ओटावा: स्वयंपाक करण्यासाठी भाजी चिरत असताना कधी कधी किड दृष्टीस पडते. मग भाजी चिरणारी व्यक्ती लगेच ती किड बाजूला काढते आणि अधिक लक्ष देऊन भाजी चिरू लागते. मात्र तुम्ही कधी भाजी चिरताना बेडूक दृष्टीस पडल्याचं ऐकलंय? कॅनडामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यासोबत हा प्रकार घडला. स्वयंपाकासाठी भाजी चिरताना अचानक बेडूक दिसल्यानं दोघांना धक्काच बसला. भाजी करण्यासाठी शिमला मिरची कापत असताना महिलेला बेडूक दिसला. मिरचीच्या आत मोठा जिवंत बेडूक दिसल्यानं दाम्पत्याला आश्चर्य वाटलं. डेली मेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे दाम्पत्यानं शिमला मिरची विकत घेतली, त्यावेळी एकाही मिरचीला छिद्र नव्हतं. त्यामुळे मिरचीमध्ये इतका मोठा बेडूक सापडला कसा, असा प्रश्न दोघांना पडला. दाम्पत्यानं बेडकाला बाजूला काढून एका भांड्यात ठेवलं. 

शिमला मिरचीमध्ये बेडूक सापडल्याची तक्रार दाम्पत्यानं सुपरमार्केटकडे केली. त्यानंतर हे प्रकरण थेट कृषी मंत्रालयापर्यंत पोहोचलं. सध्या मंत्रालयातल्या एका विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मिरचीला छिद्र नसताना बेडूक आत पोहोचलाच कसा, असा प्रश्न या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील पडला आहे. हा संपूर्ण प्रकार खाद्यपदार्थाशी संबंधित असल्यानं शिमला मिरची आणि बेडूक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. 
दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या परिसरात यंदाच्या वर्षात भाज्यांमध्ये किटक सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांना भाज्यांमध्ये किडे, कोळी सापडले आहेत. त्यामुळेच कृषी मंत्रालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके