बार्बीसारखे दिसण्यासाठी २२ लाखांचा खर्च

By Admin | Updated: May 2, 2017 00:41 IST2017-05-02T00:41:03+5:302017-05-02T00:41:03+5:30

सुंदर दिसण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. सध्या सिनेताऱ्यांपासून तर अगदी सामान्यांमध्ये सुद्धा चेहऱ्यावर

Cost of 22 lakhs to look like Barbie | बार्बीसारखे दिसण्यासाठी २२ लाखांचा खर्च

बार्बीसारखे दिसण्यासाठी २२ लाखांचा खर्च

सुंदर दिसण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. सध्या सिनेताऱ्यांपासून तर अगदी सामान्यांमध्ये सुद्धा चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्याची धूम सुरू आहे. लॉसएंजलीसमध्ये राहणारी ३० वर्षांची ओफेलिया व्हॅनेटी हिने तर बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी चक्क २२ लाख रुपये खर्च केले. एवढेच नाहीतर आपला बांधा अधिक सुडौल करण्यासाठी आणखीही काही शस्त्रक्रिया करण्याची तिची इच्छा आहे. ओफेलिओच्या सांगण्यानुसार आपण बार्बीसारखे दिसावे असे स्वप्न ती नेहमीच बघत असे. लहानपणी ख्रिसमस आणि वाढदिवसाला तिला बार्बी डॉलच भेट मिळत असे. खेळताखेळता त्या बाहुल्यांबाबत एवढी आत्मीयता निर्माण झाली की आपणही त्यांच्यासारखेच दिसावे असे वाटू लागले. मग काय तिने बार्बीसारखे दिसण्यासाठी मेकअप करणे सुरू केले. तिच्यासारखी वेशभूषा करू लागली. वाढत्या वयासोबत एवढे बदल घडत गेले की ती हुबेहूब बार्बीसारखीच दिसायला लागली.

Web Title: Cost of 22 lakhs to look like Barbie