शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 13:45 IST

CoronaVirus News : जेव्हा मागच्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा या गावानं आपल्या गावाला जोडत असलेले सगळेच मुख्य रस्ते बंद केले होते.  

एकिकडे कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनच्या संक्रमणानं  संपूर्ण देश हादरला आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्स न मिळणं तसंच मृतांचा वाढता आकडा सगळीकडे अशाच  घडामोडी कानावर पडत आहेत. अशा भयावह वातावरणातही भारतातलं एक गाव पूर्णपणे कोरोनामुक्त असून माहामारीपासून  पूर्णपणे सुरक्षित आहे. राजस्थानच्या सुखपूरा गावात १३ महिन्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. 

जेव्हा मागच्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा या गावानं आपल्या गावाला जोडत असलेले सगळेच मुख्य रस्ते बंद केले होते.  याशिवाय बाहेरून गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची तपासणी सुरू केली होती. सुरूवातीपासूनच या गावातील लोकांनी सावधगिरी आणि नियमाचे पालन करण्यास सुरूवात केली होती. 

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खंडेलाच्या सुखपूरा गावातील  लोकांनी कोरोनाच्या माहामारीत आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन केले. ३००० लोकसंख्या असलेल्या गावात वैश्विक कोरोना माहामारीत गेल्या १३ महिन्यांपासून एकही पॉझिटिव्ह केस आलेली नाही. मागच्यावर्षापासून त्यांनी गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांना आत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. 

कोणत्या व्हिटॅमिन किंवा सप्लीमेंटने तुमचा कोरोनापासून बचाव होईल? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...

ग्राम विकास अधिकारी वीरेंद सिंह यांनी सांगितले की, ''कोरोना काळात ग्रामीण प्रशासनानं चांगली  मदत  केली.  त्यामुळे जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीनं कहर केलेला असूनही  नियमांचे सक्तीनं पालन केल्यानं आम्ही सुरक्षित आहोत. ''

आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी

या गावात सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर अशा उपायांचा काटेकोरपणे वापर केला जात आहे. राजस्थानात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.  दुसरीकडे मात्र या गावात कोरोनाचा एकही रुग्ण न आढल्यामुळे  हे गाव चर्चेचा विषय ठरलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याRajasthanराजस्थान