शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

भारतीयांचा जुगाड! आता लग्नात नातेवाईकांच्या शिफ्ट्स; प्रत्येकासाठी वेळ फिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 17:49 IST

लग्नासाठी ५० पाहुण्यांची मर्यादा असल्यानं अनेकांनी शोधला जुगाड

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे एप्रिल-मे महिन्यातील अनेक विवाह सोहळे रद्द झाले. यानंतर आता अनेकांनी जूनमध्ये दोनाचे चार हात करण्याची तयारी सुरू केली आहे. जूनमध्ये लग्नाचे सहा मुहूर्त होते. त्यातील पाच मुहूर्त राहिले आहेत. एका लग्नाला केवळ ५० जणच उपस्थित राहू शकतात, असा नियम आहे. मात्र या नियमाला बगल देण्यासाठी आता वेगवेगळे जुगाड करण्याचा प्रयत्न होत आहे. लग्नात जास्तीत जास्त पाहुण्यांना उपस्थित राहता यावं यासाठी पंजाबमधील काही जणांनी वेगळीच शक्कल लढवली आहे. नातेवाईक आणि मित्रांना शिफ्टमध्ये बोलावण्याची योजना आखण्यात आली आहे. शाकाहारी जेवणास प्राधान्य देणाऱ्यांना ४ ते ६ या वेळेत बोलावलं जात आहे. त्यांच्यासाठी राजमा, चावल, पनीर असा बेत आहे. तर रात्री ६ ते ८ या वेळेत मांसाहारी जेवण आवडणाऱ्यांना निमंत्रित केलं जात आहे. त्यांच्यासाठी मटन, चिकन, कबाब आणि दारूची व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांनी लग्नात ३० ते ४५ मिनिटंच थांबावं, अशी विनंतीदेखील करण्यात येत आहे. अनेकांनी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली आहे. यामुळे लग्न समारंभात गर्दी कमी होईल. याशिवाय सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल, असा दावा करण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत ११ जणांनी जालंदर जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मॉडेल टाऊनचे रहिवासी असलेल्या राकेश शर्मांनी अशाच प्रकारचा अर्ज केला आहे. त्यांच्या बहिणीच्या मुलाचं २७ जूनला लग्न आहे. या सोहळ्यात पाहुण्यांना दोन शिफ्टमध्ये बोलावण्याची परवानगी त्यांनी प्रशासनाकडे मागितली आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करून लग्न सोहळ्यांचं आयोजन करावं, असं जालंधरचे उपायुक्त वरिंदक कुमार शर्मांनी सांगितलं. लोकांनी नियमांच्या चौकटीत राहावं. तसं केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. समारंभात ५० पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित राहता कामा नये. या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं, असं शर्मा म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न