शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : 'पती आंघोळही करत नाही अन् रोज शरीरसंबंधाची मागणी करतो', विचित्र प्रकाराची पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 14:31 IST

काही दिवसांपूर्वी घाना देशातील एका महिलेची अशीच तक्रार चर्चेचा विषय ठरली होती. आता भारतीतली महिलांनाही अशा समस्येचा सामना करावा लागत आहे.

(सांकेतिच छायाचित्र)

काही दिवसांपूर्वी आफ्रिकन देश घानातील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तिने सरकारकडे लॉकडाऊन उठवण्याची मागणी केली होती, कारण ती तिच्या पतीच्या सततच्या शारीरिक संबंधाच्या मागणीला वैतागली होती. 

आता अशीच तक्रार भारतातील एक महिलेने केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देभभरात लॉकडाऊन आहे आणि लोक घरातच आहेत. दरम्यान बंगळुरू पोलिसांच्या महिला हेल्पलाईनवर एका महिलेचा कॉल करुन आपली तक्रार दाखल केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, येथील महिलेने पोलिसांच्या 'परिहार' या विशेष हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला होता. यावेळी तिने पोलिसांकडे जी तक्रार केली त्याने पोलिसही चक्रावले.

महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, ज्या दिवसापासून लॉकडाऊन सुरु झाला त्या दिवसापासून तिच्या पतीने आंघोळच केली नाहीये. महिलेचा आरोप आहे की, नवरा आंघोळही करत नाही आणि दररोज शारीरिक संबंधाची मागणी करतो. 

पतीच्या  वागण्याला वैतागलेल्या या महिलेने तक्रारीत सांगितले की, तिचा पती एका दुकानात काम करतो. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दुकान बंद आहे आणि तेव्हापासून म्हणजेच २४ मार्चपासून पतीने आंघोळ करणंही बंद केली आहे. 

इतकेच नाही तर  या महिेलेने तिच्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, कोरोनामुळे स्वच्छता ठेवणं आणि सॅनिटायजरचा वापर करणं गरजेचं आहे. मात्र, पती दुर्लक्ष करतो. उलट दररोज शारीरिक संबंधाची मागणी करतो. तसेच, त्याला संबंध ठेवण्यास नकार दिला तर त्याने मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशातील विविध भागांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यांतील पोलिसांनी विशेष हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. ज्यावर अनेक तक्रारी येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBengaluruबेंगळूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी