सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या युवकाने तयार केला भन्नाट व्हिडीओ, तुम्हीही पाहाल तर म्हणाल, Wow..!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 06:14 PM2020-04-13T18:14:16+5:302020-04-13T19:37:40+5:30

Coronavirus : कोरोनाला हरवण्यासाठी लोकांनी घरात राहावे आणि सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन सरकारकडून येत आहे. 

Coronavirus : bengaluru man shares comical dance video and people are loving his editing skills rkp | सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या युवकाने तयार केला भन्नाट व्हिडीओ, तुम्हीही पाहाल तर म्हणाल, Wow..!

सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या युवकाने तयार केला भन्नाट व्हिडीओ, तुम्हीही पाहाल तर म्हणाल, Wow..!

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, कोरोनाला हरवण्यासाठी लोकांनी घरात राहावे आणि सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन सरकारकडून येत आहे. 

लाकडाऊनमुळे सर्रास लोक आपल्या घरात असल्यामुळे त्यांना आऊटडोअर अॅक्टिव्हिटी करता येत नाहीत. मात्र, लॉकडाऊनदरम्यान अनेक लोक घरात राहून इंटरनेटचा वापर करत स्वत:ला कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर, अन्य लोक रिकाम्या वेळेत आपल्या कौशल्याचा वापर करत स्वत:चे आणि दुसऱ्यांचे मनोरंजन करत आहेत. 

अशाच प्रकारे बंगळुरु येथील २४ वर्षीय एका इंजिनीअरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आदित्य कोटा बद्रिनाथ याने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तो जॅक स्टॉबरच्या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. 

विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये आदित्य याने एडिटिंग केली आहे. एडिटिंगसाठी त्याने अॅडोब इल्युस्ट्रेटर आणि अॅडोब प्रीमियर प्रो या सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आदित्य याने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच, ट्विटरवर एडिटिंग कौशल्याबाबत आदित्यचे कौतुक होताना दिसून येते.

Web Title: Coronavirus : bengaluru man shares comical dance video and people are loving his editing skills rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.