गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

By Admin | Updated: June 30, 2014 12:45 IST2014-06-30T02:07:05+5:302014-06-30T12:45:29+5:30

उद्योजकाला उद्योग सुरू करायचा असेल तर 16 निरीक्षकांना तोंड द्यावे लागते, या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या वक्तव्याने वाद उभा राहिला.

The controversial statements of Goa Chief Minister | गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

>पणजी : बलात्कारित महिलेला केवळ एका पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीला सामोरे जावे लागते. उद्योजकाला उद्योग सुरू करायचा असेल तर 16 निरीक्षकांना तोंड द्यावे लागते, या मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या वक्तव्याने वाद उभा राहिला.
‘बायलांचो साद’ या सामाजिक संघटनेने र्पीकर यांच्या वक्तव्यास तीव्र आक्षेप घेतला असून, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य त्यांच्या असंवेदनशीलतेचे प्रतिक आहे, असे संघटनेच्या अध्यक्षा सबिना मार्टिन्स यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री र्पीकर यांनी शुक्रवारी उद्योजकांच्या बैठकीत बोलताना केलेले हे वक्तव्य असंवेदनशील  आहे, हा महिलांचा अपमान आहे, असे मार्टिन्स यांनी म्हटले आहे. बलात्कारित महिलेला एकाच पोलीस निरीक्षकाला सामोरे जावे लागत नसून, कौन्सिलर व डॉक्टरांनाही ती घटना वारंवार कथन करावी लागते, याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसावी, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: The controversial statements of Goa Chief Minister