शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

काँग्रेसच्या नेत्याचा विवाह सोहळा, नवरीनं थार ड्राइव्ह करत गाठलं सासर, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 17:08 IST

Congress leader's wedding ceremony : हा विवाह सोहळा उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रंगल्याचे सांगण्यात येत आहे. हे नवदाम्पत्य काश्मीरमधील आहे. यामधील वराचा भाऊ जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे.

नवी दिल्ली - विवाह सोहळ्यांमध्ये वधूंची रॉयल एंट्री तुम्ही पाहिली असेल. मात्र आज एका वधूला देण्यात आलेला थाटामाटातील निरोप समोर आला आहे. या पाठवणीमध्ये ना अश्रू होते. ना दु:ख. उलट वधूचे नातेवाईक हसत हसत तिला निरोप देत होते. तर वधूही महिंद्रा थार गाडी चालवत सासरी रवाना झाली. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Congress leader's wedding ceremony, bride reaches father-in-law while driving Thar, VIDEO goes viral)

हा विवाह सोहळा उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रंगल्याचे सांगण्यात येत आहे. हे नवदाम्पत्य काश्मीरमधील आहे. यामधील वराचा भाऊ जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहे. तर वर हा स्वत: काँग्रेसचा नेता आहे. या काँग्रेस नेत्याचा विवाहा काश्मीरमध्येच राहणाऱ्या तरुणीसोबत दोन दिवसांपूर्वी झाला होता. विवाहानंतर सासरी जाण्यासाठी या तरुणीने जरा हटके मार्ग निवडला. ही वधू महिंद्रा थारच्या ड्रायव्हिंग सिटवर बसली. तर वर तिच्या शेजारी बसला. त्यानंतर ही वधू स्वत: गाडी चालवत सासरला रवाना झाली. त्यानंतर सासरी गेटवर उभ्या असलेल्या सासरच्या मंडळींनी तिचे जोरदार स्वागत केले.

या वधूचे नाव सना वानी आहे, तर वराचे नाव शेअर अमीर आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शेख अमीर यांनी सांगितले की, सनाने मला गाडी चालवण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर मी तिच्याकडे गाडीचे स्टिअरिंग सोपवले. हे सारे काही अचानक घडले. पण आमचा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल, असे आम्हाला वाटले नव्हते. 

दरम्यान, सना हिने सांगितले की, ती बऱ्याच दिवसांपासून गाडी चालवते. मला माझ्या वडिलांनी गाडी चालवायला शिकवले होते. महिला गाडी चालवू शकतात, असे अनेक पुरुषांना वाटते. माझ्या विवाहादिवशीही अनेकांना असेच वाटत होते. मात्र मी गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. अनेकजण टीका करत आहेत. मात्र मला त्याची चिंता नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न