फसवणुकीची तक्रार ग्राहक मंचाने फेटाळली

By Admin | Updated: August 14, 2014 00:45 IST2014-08-14T00:35:01+5:302014-08-14T00:45:11+5:30

विकत घेतलेली सदनिका आपल्या गरजेमुळे दुसऱ्याकडे गहाण ठेवून त्याच्याकडून आगाऊ पैसे घेतले.

The complaint was rejected by the customer forum | फसवणुकीची तक्रार ग्राहक मंचाने फेटाळली

फसवणुकीची तक्रार ग्राहक मंचाने फेटाळली

ठाणे : विकत घेतलेली सदनिका आपल्या गरजेमुळे दुसऱ्याकडे गहाण ठेवून त्याच्याकडून आगाऊ पैसे घेतले. परंतु त्यानंतरही पुन्हा विकासकाने फसवणूक केली, अशी मंचाकडे दाखल करण्यात आलेली खोटी तक्रार ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार मंचाने अमान्य केली आहे.
डोंबिवली येथे राहणारे जयेश कारकर यांनी संकल्प एन्टरप्राईजेस यांच्याकडून डोंबिवली पूर्व संकल्पसिद्धी अपार्टमेंट येथील सदनिका ४ लाख ५ हजारात विकत घेतली होती. परंतु तक्रारदार कारकर यांनी संकल्प एंटरप्रायजेस्ने पूर्ण रक्कम घेतल्यानंतरही सदनिकेचा ताबा न देता फसवणूक केली. तसेच संकल्प एंटरप्रायजेस्ने आपल्या पुरावे, शपथपत्रात सादर केलेली माहिती ही चुकीची आहे. कोऱ्या कागदपत्रांवर सह्या घेवून लबाडीने फसवणूक केल्याचे सांगत ग्राहक मंचाकडे तक्रार केली. याबदल्यात सदनिकेच्या किमतीवर २४ टक्के व्याज आणि नुकसानभरपाई म्हणून २५ हजार द्यावेत अशी मागणी केली. याबाबत संकल्प एंटरप्रायजेस्ने कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने मंचाने एकतर्फी आदेश दिला होता. पुरावे आणि स्पष्टीकरण यावरून मंचाने कारकर यांची तक्रार अमान्य करून उलट कारकर यांनीच स्वत:च्या फायद्यासाठी माहिती लपवून ठेवली हे स्पष्ट करत ही तक्रार अमान्य केली. (प्रतिनिधी)

Web Title: The complaint was rejected by the customer forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.