शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

इथे एकाजागी येतात देशातील आळशी लोक, भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 12:27 IST

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे लोक एक दिवस थकू शकतात आणि पूर्ण दिवस बेडवर आळस करत पडून राहू शकतात. 

सध्याची लाइफस्टाइलची फारच धावपळीची झाली आहे. अनेकांना या लाइफस्टाइलमुळे डिप्रेशन, स्ट्रेसचा सामना करावा लागत आहे. अनेकांना तर आराम करायलाही वेळ मिळत नाही. असे म्हणता येईल की, जीवनाच्या या धावपळीत थकना मना हैं...पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे लोक एक दिवस थकू शकतात आणि पूर्ण दिवस बेडवर आळस करत पडून राहू शकतात. हा देश आहे कोलंबिया. या देशातील लोक तणावाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकवर्षी 'आळस दिवस' दिवस साजरा करतात. 

कोलंबियाच्या इतागुई शहरात गेल्या रविवारी 'वर्ल्ड लेझिनेस डे' साजरा करण्यात आला. यासाठी लोक आपल्या घरातून उश्या, गादी, बेड घेऊन रस्त्यावर झोपताना दिसले. 

संपूर्ण दिवसभर आळस करण्याचा हा खास दिवस नवीन नाहीये. १९८५ पासून हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे गेल्या ३३ वर्षांपासून हा दिवस साजरा केला जातो. 

कोलंबियातील इतागुई शहराची लोकसंख्या २ लाख इतकी आहे. ३३ वर्षांपूर्वी एक नागरीक मारियो मोटोंयाने हा विचार आणला होता. त्याने म्हटले होते की, लोकांकडे एक आराम करण्याचा दिवस असावा.

या दिवशी आळशी लोकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात. म्हणजे कुणाचा पायजामा सर्वात चांगला आहे किंवा कोण सर्वात लवकर बेडवर पोहोचू शकतो, अशा या स्पर्धा असतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेColombiaकोलंबिया