शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे, एकनाथ शिंदेंना काय मिळणार?
2
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
3
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
4
किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!
5
काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
6
"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
7
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
8
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
9
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
10
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
11
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
12
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
13
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
15
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
16
400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
17
वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?
18
“आमचा ८० टक्के स्ट्राइक रेट, विधानसभेला १८० जागा निवडून येतील”; जयंत पाटील यांचा दावा
19
लाचखोरीचं गुजरात मॉडेल, भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाच देण्यासाठी दिली EMI सुविधा 
20
राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

Christmas 2020 : ....म्हणून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो ख्रिसमस; माहीत करून घ्या या सणाचं महत्त्व

By manali.bagul | Published: December 24, 2020 7:19 PM

Christmas 2020 Why do we celebrate christmas : सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे नेहमीपेक्षा यंदा ख्रिसमसचा उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे. तरिही बाहेर न जाता लोक घरच्याघरी हा जण उत्साहाने साजरा करतील.

(Image Credit- Tour my india)

सगळीकडेच ख्रिसमससाठी अनेकांनी आपली घरे सजवली असून जल्लोषाच्या तयारीत आहेत.  सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे नेहमीपेक्षा यंदा ख्रिसमसचा उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे. तरिही बाहेर न जाता लोक घरच्याघरी हा जण उत्साहाने साजरा करतील. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. 

ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व

रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.

या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात. ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराल असे म्हणतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेChristmasनाताळ