शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घटत्या लोकसंख्येमुळे चीनचा अजब निर्णय; लग्न न झालेल्या जोडप्यांना दिली मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:48 IST

चीनमध्ये अधिक मुले जन्माला येण्यासाठी लोकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत.

दिवसेंदिवस लोकसंख्येत होणारी घट पाहता चीनची डोकेदुखी वाढली आहे. लोकसंख्या वाढीसाठी चीन आता अजबगजब कायदे बनवू लागला आहे. चीनने लोकांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालणे आणि लग्न सहजपणे व्हावे यासाठी ब्राइड प्राइस नावाची परंपरा संपुष्टात आणली आहे. ही परंपरा म्हणजे मुले मुलीकडच्यांना हुंडा देतात. या लग्नासाठी जवळपास वर्षभर जातो. त्याशिवाय लग्नावरही मोठा खर्च होतो. त्यामुळे अनेक तरुण लग्नही करत नाहीत. आता चीन सरकारने ही परंपरा संपवण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय चीन सरकारने लग्न न करता बाळ जन्माला घालण्याची परवानगी दिली आहे. 

लोकसंख्या वाढीसाठी चीनची उपाययोजनाचीन देशाची लोकसंख्या वाढविण्यासाठी सतत नवीन उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दशकांत चीनमध्ये जन्म दर कमी झाला आहे. इथल्या वृद्ध लोकांची लोकसंख्या वाढली आहे, तर युवक आणि कामगार लोक कमी झाले आहेत. यामुळे अस्वस्थ चीनने गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. 

हुंडा प्रणालीविरूद्धही उचलली पावले लोकांनी हुंडा प्रणाली आणि खर्चिक विवाहसोहळाविरूद्धही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जागरूकता मोहिम आयोजित केली जात आहे. या व्यतिरिक्त, अनेक ठिकाणी महिला दिनानिमित्त चीनी सरकारकडून सामूहिक विवाह देखील आयोजित केले जात आहेत.

कपल लिव्ह-इनमध्येही मुले जन्माला घालू शकतातचीनमध्ये अधिक मुले जन्माला येण्यासाठी लोकांना विशेष सुविधा देण्यात येत आहेत. चीनमध्ये एक पुराणमतवादी समाज आहे आणि तेथे कठोर नियम पाळले जातात. परंतु आजकाल चीन सरकार लोकसंख्या वाढविण्यासाठी अशा अनेक उपायांचा अवलंब करीत आहे, ज्याने अनेक जण हैराण झाले आहेत. नियम बदलून चीनच्या सिचुआन प्रांतात आता लग्न न झालेल्या जोडप्यांनाही प्रसूतीची रजा आणि वैद्यकीय खर्च प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. सिचुआनमध्ये आता लग्न न होता झालेल्या आईलाही त्या सरकारी सुविधांचा फायदा होईल, जे आतापर्यंत फक्त विवाहित जोडप्यांना मिळत असे. सिचुआन हा चीनमधील ५ वा सर्वात मोठा प्रांत आहे. त्याची लोकसंख्या सुमारे साडेतीन कोटी आहे, जी कमी होत आहे. या कारणास्तव, सिचुआन प्रांताने बाकी देशापेक्षा एक पाऊल पुढे विचार केला आहे. देशातील तीन मुलांच्या धोरणाऐवजी सिचुआनने मुलांच्या संख्येवरील प्रत्येक बंदी उठवली आहे. या सुविधा चीनमध्ये उपलब्धमुले होण्यासाठी सरकारने नव्याने विवाहित जोडप्यांना ३० दिवसांची पगाराची रजा देण्याची घोषणा केली आहे. याचा हेतू असा आहे की पती -पत्नी वेळ घालवू शकतात आणि लोकसंख्या वाढविण्यात भागीदार बनू शकतात. यापूर्वी चीनमध्ये लग्नासाठी फक्त तीन दिवसांची पगाराची रजा होती. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत