शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 11:51 IST

चीनच्या या कृतीचा अर्थ काय? यावरून सोशल मीडियात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत

Toilet timers in China: चीन हा अतिशय प्रगत देशांपैकी एक मानला जातो. पण त्यासोबतच चीनचे सत्ताधीश काहीसे आक्रमक पद्धतीने आपला देश चालवतात अशाही चर्चा अनेकदा कानावर येतात. आपल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या नवनवीन पद्धती अवलंबण्यासाठी चीन कुप्रसिद्ध आहे. आता या संदर्भात चीन सरकारने आणखी एक नवीन पाऊल उचलले असून त्यात पर्यटकांचाही समावेश आहे. चीनने चक्क कॉमन वॉशरूम आणि टॉयलेटच्या वर टायमर लावले आहेत. जेणेकरून लोक आत किती वेळ घालवत आहेत हे कळू शकेल. टॉयलेटच्या बाहेर टायमर लावल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ युनगांग बौद्ध ग्रोटोजच्या स्वच्छतागृहातील फोटो व्हायरल झाले आहेत.

चीनमधील युनगांग या ठिकाणी १५०० वर्षांपूर्वीच्या २५२ गुहा आणि ५१,००० मूर्ती आहेत. त्या पाहण्यासाठी २०२३ मध्ये ३० लाखांहून अधिक पर्यटक येथे आले होते. तेथे बांधलेल्या स्वच्छतागृहांमध्ये आता टायमर लावण्यात आले आहेत. तुम्ही टॉयलेटचा दरवाजा लावल्यानंतर तुम्ही किती वेळ टॉयलेटमध्ये आहात, हे प्रत्येक टॉयलेटबाहेरील डिजिटल टायमरने समजते. द सनच्या वृत्तानुसार, जेव्हा एखादे स्वच्छतागृह रिकामे असते, तेव्हा पिक्सेलेटेड एलईडी स्क्रीनवर 'रिकामे' असा शब्द हिरव्या रंगात दिसतो. जेव्हा कोणी शौचालयाच्या आत जाते, तेव्हा दरवाजा बंद होताच त्यावर वेळ सुरू होते आणि मिनिट व सेकंदांचा आकडा दिसू लागतो. दरवाजा उघडल्यावर कोणी किती वेळ शौचालयाचा वापर केला ते दिसते.

चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर टॉयलेटमधील टायमरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक युजर्सने यावर टीका केली आहे. तर अनेकांनी गंमतीत म्हटले आहे की यामुळे पर्यटकांना टॉयलेटमध्ये बसून फोन स्क्रोल करण्यापासून आळा बसेल.

टॅग्स :chinaचीनSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल