मणिपुरात मुख्यमंत्र्यांचे घर फोडले

By Admin | Updated: June 17, 2014 00:20 IST2014-06-17T00:20:50+5:302014-06-17T00:20:50+5:30

मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या थोउबल जिल्ह्यातील खासगी निवासस्थानी चोरी झाल्याचे वृत्त आहे.

Chief Minister's house in Manipur | मणिपुरात मुख्यमंत्र्यांचे घर फोडले

मणिपुरात मुख्यमंत्र्यांचे घर फोडले

इम्फाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या थोउबल जिल्ह्यातील खासगी निवासस्थानी चोरी झाल्याचे वृत्त आहे. चोरांनी मुख्यमंत्र्यांचे घर फोडले आणि मौल्यवान वस्तू व रोख रक्कम लुटून पसार झाले.
सिंग यांच्या पत्नी लानधोनीदेवी या रविवारी घरी गेल्यावर घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, अशी माहती पोलिसांनी दिली.
ज्या घरी चोरी झाली तेथे मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कुणीही राहत नाही आणि घराला कुलूप लावलेले असते. मुख्यमंत्र्यांच्या या खासगी निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी ३० इंडिया रिझर्व्ह बटालीयनचे जवान तैनात करण्यात आले आहेत. परंतु हे सर्व जवान सिंग यांचे धाकटे बंधू ओकराम इबोतोआम्बा यांच्या घराचे संरक्षण करतात.
चोरी केव्हा झाली हे कळले नाही. या घटनेनंतर सर्व जवानांना हटवून त्यांच्या जागी दुसरे जवान तैनात करण्यात आले आहेत.
(वृत्तसंस्था)

Web Title: Chief Minister's house in Manipur