शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

55 वर्षीय अमेरिकन महिला पडली 25 वर्षीय भारतीयाच्या प्रेमात; लग्नासाठी आली साता समुद्रपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 12:07 IST

अमेरिकन महिला आणि तरुणाची पहिली भेट सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी झाली होती.

प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. मध्य प्रदेशातील छतरपूरच्या खजुराहो येथील तरुणाची प्रेमकहाणीही अशीच आहे. त्याच्या प्रेमात असलेली 55 वर्षीय अमेरिकन महिला लग्नासाठी अर्ज करायला खजुराहो येथे आली आहे. सांचेज वार्गेस मार्थाजूलिया असं या महिलेचं नाव असून ती मूळची कॅलिफोर्नियाची आहे. सांचेज ही योगा टिचर आहे. तसेच अमन तनय शेख आझाद असे या तरुणाचे नाव असून तो खजुराहो येथील रहिवासी आहे. लवकरच दोघेही लग्न करणार आहेत.

अमेरिकन महिला आणि तरुणाची पहिली भेट सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी झाली होती. तरुणाने सांगितले की, ती खजुराहोला भेट देण्यासाठी आली होती. याच दरम्यान ती दुकानात खरेदी करण्यासाठी आली होती, तो तरुण तिथे काम करत असे आणि पहिली भेट तिथेच झाली. त्यानंतर ती जेव्हाही अमेरिकेतून यायची तेव्हा ती अमन तनय शेख आझादला भेटायची आणि त्याच्या घरीही जायची. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

ADM ने दिली माहिती 

एडीएमने सांगितले की, एक असा अर्ज आला होता, ज्यामध्ये एका विदेशी महिलेला खजुराहो येथील मुलाशी लग्न करायचे आहे. अर्ज आल्यानंतर तो स्वीकारून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला. तसेच कुटुंबही यासाठी तयार असल्याचे सांगितले. 

खजुराहोतील मुलांचे याआधीही परदेशी मुलींसोबत लग्न झाल्याची प्रकरणे समोर येत आहेतखजुराहो हे एक जागतिक पर्यटन स्थळ आहे, बहुतेक परदेशातून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे याआधीही अशी प्रकरणे येथे पाहायला मिळाली आहेत. असे सांगितले जात आहे की छतरपूरच्या खजुराहोमध्ये आतापर्यंत 50 हून अधिक लोकांनी अशा प्रकारे लग्न केले आहे आणि ते चांगले आयुष्य जगत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्नIndiaभारतAmericaअमेरिका