शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

122 वर्षांपासून सतत चालू आहे 'हा' बल्ब, गिनीज बुकमध्येही आहे नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 14:34 IST

Jarahatke : तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, जगात एक असाही बल्ब आहे, जे गेल्या ११८ पासून सतत पेटत आहे. आजपर्यंत हा बल्ब फ्यूज झालाच नाही. 

Jarahatke : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर सहजपणे विश्वास ठेवणं फारच अवघड जातं. काही गोष्टींचं रहस्य आजही उलगडलं जात नाही. अशीच एका बल्बची कहाणी आहे. सामान्यपणे कोणताही बल्ब विकत घेताना कंपन्या साधारण १ किंवा फार फार तर २ वर्षांची गॅरंटी देतात. अशात तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल की, जगात एक असाही बल्ब आहे, जे गेल्या ११८ पासून सतत पेटत आहे. आजपर्यंत हा बल्ब फ्यूज झालाच नाही. 

या अजब बल्बला सेंटेनिअल या नावाने ओळखलं जातं. कॅलिफोर्नियाच्या लिव्हरमोर शहरातील अग्नीशमन दलाच्या केंद्रात असलेला हा बल्ब  शेल्बी इलेक्ट्रॉनिक कंपनीने तयार केला होता. हा बल्ब पहिल्यांदा १९०१ मध्ये पेटवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा बल्ब सतत पेटताच आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९३७ मध्ये विजेचा तार बदलण्यासाठी हा बल्ब पहिल्यांदा बंद करण्यात आला होता आणि तार दुरूस्त केल्यावर हा बल्ब पुन्हा पेटवण्यात आला. या बल्बची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या बल्बवर सीसीटीव्ही कॅमेराने नजर ठेवली जाते.

चार व्हॉल्ट विजेवर चालणारा हा बल्ब २५ तास पेटताच ठेवला जातो. २००१ मध्ये या बल्बचा १००वा वाढदिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला गेला होता. आता तर हा अनोखा बल्ब बघण्यासाठी दूरदुरून लोक येतात. या अग्नीशमन केंद्रात इतकी गर्दी होते की, जणू इथे म्यूझिअम आहे.

२०१३ मध्ये हा बल्ब आपोआप बंद झाला होता. तेव्हा लोकांना वाटलं होतं की, बल्ब फ्यूज झाला असेल, पण जेव्हा चेक केलं तर तार खराब झाली होती. तार पुन्हा दुरूस्त करण्यात आली आणि बल्ब पुन्हा पेटला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके