‘टीव्ही शो’ सेन्सॉर करा!
By Admin | Updated: September 4, 2014 11:05 IST2014-09-04T03:00:05+5:302014-09-04T11:05:02+5:30
भारतीय युवकांमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट करणा:या एका खासगी वाहिनीवरील रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

‘टीव्ही शो’ सेन्सॉर करा!
मुंबई : भारतीय युवकांमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट करणा:या एका खासगी वाहिनीवरील रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. टीव्ही शोवर नियंत्रण नसल्याने कसलेही कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याने टीव्ही शो सेन्सॉर करण्याची मागणीही केली आहे.
भारतीय वाहिनीवर प्रसारित होणा:या एका रिअॅलिटी शोमध्ये तरुण-तरुणी आपले स्थान पक्के करण्यासाठी धडपडतात. आपला प्रियकर, प्रेयसी शोधण्यासाठीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एकमेकांत मिसळतात. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात एक मुलगा आणि मुलगी विजेते घोषित केले जातात. मात्र यात एकमेकांमध्ये द्वेष, मत्सर, भांडणो होतात. या शोमुळे देशाच्या भावी पिढीमधील संस्कृती आणि नैतिकता नष्ट केली जात आहे. देशात महिलांवरील अत्याचारांत झालेली वाढ या समस्यांवर तोडगा शोधत असताना अशा प्रकारच्या रिअॅलिटी शोचे प्रसारण होणो चुकीचे आहे, असे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणो आहे. (प्रतिनिधी)