'ऐ दिल है मुश्किल'मधील बोल्ड दृश्यांना सेन्सॉरची कात्री

By admin | Published: October 13, 2016 05:05 PM2016-10-13T17:05:23+5:302016-10-13T17:05:23+5:30

ऐ दिल है मुश्कील या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या बोल्ड दृश्यांना कात्री लावल्याची माहिती आता समोर येते आहे

Censor scissors of bold scenes in 'Ai Dil Hai Tough' | 'ऐ दिल है मुश्किल'मधील बोल्ड दृश्यांना सेन्सॉरची कात्री

'ऐ दिल है मुश्किल'मधील बोल्ड दृश्यांना सेन्सॉरची कात्री

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्कील या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेल्या बोल्ड दृश्यांना कात्री लावल्याची माहिती आता समोर येते आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा सहभाग असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर आधीपासूनच टांगती तलवार आहे. मनसेनं हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्धार केला असतानाच आणखी एक प्रसंग या चित्रपटाच्या प्रदर्शनावर ओढावला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांची केमिस्ट्री असणाऱ्या या चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री लागल्याची चर्चा आहे. बहुचर्चित चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी ऐश्वर्या आणि रणबीरवर चित्रीत करण्यात आलेल्या बोल्ड दृश्यांना सेन्सॉरने चित्रपटातून काढून टाकले. विशेष म्हणजे ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांनी या दृश्यांवर आक्षेप घेऊन करण जोहरला ते चित्रपटातून काढून टाकण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरूनच ही आक्षेपार्ह दृश्यं काढल्याची चर्चा आहे.

सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून रणबीर आणि ऐश्वर्याचा बोल्ड सीनही गायब करण्यात आला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाची सध्या रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, या चित्रपटामधून पाकिस्तानी अभिनेता फवाद खान ऐवजी त्याच्या भूमिकेसाठी सैफ अली खानचे नाव चर्चेत आहे. पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटात फवाद दिसणार की नाही हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच समजणार आहे. येत्या २८ ऑक्टोबरला हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Censor scissors of bold scenes in 'Ai Dil Hai Tough'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.