12Kg Gold Coin :10 ग्रॅम किंवा 20 ग्रॅमची सोन्याची नाणी तुम्ही पाहिली असतीलच. पण जगात सोन्याचं एक इतकं जास्त वजनी नाणं आहे ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जगातल्या सर्वात मोठ्या सोन्याच्या नाण्याचं वजन साधारण 20 किलोग्रॅम आहे. आता हे नाणं भलेही गायब झालं असेल, पण हे नाणं भारतात तयार करण्यात आलं होतं. आता केंद्र सरकारने पुन्हा हे नाणं नव्याने शोधणं सुरू केलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने साधारण 4 दशकांआधीच या सोन्याच्या नाण्याचा शोध सुरू केला होता. पण सीबीआयला तेव्हा हे नाणं शोधण्यात यश मिळालं नाही. हे नाणं शेवटचं हैद्राबादमधील शाही परिवाराचे टायटलर निजाम VIII मुकर्रम जाहकडे बघण्यात आलं होतं. त्याने हे नाणं स्विस बॅंकेत लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. जाह याला हे नाणं शेवटचा निजाम आणि त्याचे आजोबा मीर उस्मान अली खान यांच्याकडून मिळालं होतं. सीबीआयने तो कथित लिलाव लोकेट करण्याचा प्रयत्नही केला होता. पण त्यात यश मिळालं नाही.
असं सांगितलं जातं की, हे नाणं बादशाह जहांगीरने बनवून घेतलं होतं. इतिहासकार एचके शेरवानी सेंटर फॉर डेक्कन स्टडीजच्या प्रोफेसर सलमा अहमद फारूकी यांच्या हवाल्याने सांगितले की, या नाण्याचा 1987 मध्ये जिनेव्हामध्ये लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यूरोपमध्ये असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी याची माहिती भारत सरकारला दिली होती. त्यांनी या नाण्याचा लिलाव 1987 मध्ये जिनेव्हाच्या एका हॉटेलमध्ये होणार असल्याची सूचना मिळाली होती. सीबीआयने हे प्रकरण हाती घेतलं आणि चौकशी सुरू केली होती. पण नाण्याचा काही पत्ता लागला नाही.
ते म्हणाले की, सीबीआय अधिकाऱ्यांनी इतिहासकारांचं काम केलं. त्या चौकशी सहभागी अनेक अधिकारी आता निवृत्त झाले आहेत. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. सीबीआयचे माजी जॉइंट डायरेक्टर शांतनु सेन यांनीही या नाण्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला आहे. त्यांनी सांगितलं की, बादशाह जहांगीरने दोन नाणी तयार केल्या होत्या. एक नाणं इराणचे शाहचे राजदूत यादगार अलीला देण्यात आलं होतं आणि दुसरं नाणं हैद्राबादच्या निजामाकडे होतं.
प्रोफेसर सलमा यांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, सीबीआयच्या स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट XI ने 1987 मध्ये अॅंटीक अॅन्ड आर्ट ड्रेजर्स अॅक्टनुसार ही केस तयार केली होती. चौकशीतून समोर आली की, मुकर्रम जाहने 1987 मध्ये स्विस लिलावात सोन्याची दोन नाणी विकण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एका नाण्याचं वजन 1 हजार तोळे होतं. 1987 मध्ये या नाण्याची व्हॅल्यू 16 मिलियन डॉलर अंदाजे ठरली होती.
शांतनु सेन यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं की, बॅंक आणि मुकर्रम जाह यांच्यात झालेल्या संवादात लोनच्या बदल्यात दोन नाणी गहाण ठेवण्याचा उल्लेख होता. ही दोन्ही नाणी कॅरेबियात मेंढी पालनासाठी दोन कंपन्या क्रिस्टलर सर्व्हिसेज आणि टेमारिंड कॉर्पोरेशनच्या फायनान्सिंगसाठी गहाण ठेवण्याची बोलणी सुरू होती. ते म्हणाले की, आता तर अनेक वर्ष उलटून गेली आहेत. पण अजूनही या नाण्याबाबत काहीच समजलं नाही. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, केंद्र सरकारच्य प्रयत्नांना यश मिळेल.