शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एक असा क्रूर सम्राट जो बहिणीसोबत ठेवत होता संबंध, पत्नीला मित्रांसमोर केलं होतं नग्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 12:04 IST

रोमच्या या राजाच्या वेगळ्या प्रयोगांचं जेवढं कौतुक केलं जायचं, तेवढंच त्याच्या वाईट गोष्टींबाबतही बोबलं जायचं. 

इतिहासात अनेक राजे - हुकूमशहांच्या नोंदी आहेत. त्यांच्या कारनाम्यांच्या नोंदी आहेत. ज्या इतक्या वर्षांनंतर आजही चर्चेचा विषय ठरत असतात. काही राजे हे त्यांच्या चांगल्या कामांसाठी ओखळले जातात तर काही राजे त्यांच्या क्रूरतेसाठी. आज आम्हाला तुम्हाला अशाच एका क्रूर राजाबाबत सांगणार आहोत. रोमचा तिसरा सम्राट गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस. रोमच्या या राजाच्या वेगळ्या प्रयोगांचं जेवढं कौतुक केलं जायचं, तेवढंच त्याच्या वाईट गोष्टींबाबतही बोबलं जायचं. 

अजब कारणासाठी देत होता फाशी

गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस हा दिसायला उंच आणि सडपातळ होता. तसेच त्याचे डोळे आतल्या बाजूस अधिक होते. शारीरिक रूपाने मजबूत नसल्याने त्याची खिल्ली उडवली जात होती. इतकेच नाही तर त्यांच्या डोळ्यांमुळे लोक त्याची तुलना अनेकदा बकरीसोबत करत होते. त्यामुळे जेव्हा कधी त्याच्यासमोर बकरीचा उल्लेख करत असे, राजा त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देत होता.

घोड्याला केलं होतं मंत्री 

रोमच्या या सम्राटाला घोड्यांची फार आवड होती. तो त्याच्या इनसिटॅटस या घोड्याच्या फार जवळ होता. इतकेच नाही तर असेही म्हटले जाते की, इनसिटॅटससाठी त्याने एक सुंदर घरही तयार करून घेतलं होतं. तो घोड्यांबाबत फार वेडा होता. त्यामुळे असेही मानले जाते की, त्याने त्याच्या घोड्यांच्या वेडा पायी एका घोड्याला राज्यमंत्रीही केलं होतं.

बहिणीसोबत अनैतिक संबंध

असेही मानले जाते की, गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकसचे त्याच्या बहिणीसोबत शारीरिक संबंध होते. इतकेच नाही तर ज्योतिषाची भविष्यवाणी चुकीची सिद्ध करण्यासाठी एक पुल बांधला होता. ज्यामुळे रोममध्ये दुष्काळ पडला होता. या सम्राटाच्या याच अनेक गोष्टींवर अनेक माहितीपट आणि सिनेमे सुद्धा आले आहेत. 

सोन्याच्या दागिण्यांसोबत आंघोळ

जर्मेनिकस म्हणजेच कालिगुला याला सोन्याची फार आवड होती. तो बाथटबमध्ये सोन्याने दागिने आणि नाणी टाकून आंघोळ करत असे. तसेच असेही सांगितले जाते की, तो मोत्यांचं पाणी करून पित असे.

मित्रांसमोर पत्नीला नग्न फिरवलं

या सम्राटाने चार लग्ने केली होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने एका महिलेला तिच्या लग्नाच्या दिवशीच पळून आणले होते आणि तिच्याशी लग्न केले. तर त्याच्या तिसऱ्या पत्नीचं आधीच दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. त्याची चौथी पत्नी मिलोनिया फार बुद्धिमान आणि सुंदर होती. हेच सिद्ध करण्यासाठी सम्राटाने तिला त्याच्या मित्रांसमोर नग्न करुन फिरवले होते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके