Jarahatke : जगात अशी अनेक गावं आहेत, जी आपल्या वेगळेपणासाठी ओळखली जातात. ही गावं जगातील इतर गावांपेक्षा खूप वेगळी आणि मनाला शांतता देणारी असतात. असंच एक गाव उरूग्वेच्या पूर्व तटावर वसलेलं आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही, पण या गावात मोबाईल चार्जिंग करण्यासाठी सुद्धा मोठी धडपड करावी लागते. आधुनिक सोयी-सुविधा आणि टेक्नॉलॉजीपासून दूर असलेलं हे काबो पोलोनियो (Cabo Polonio, Uruguay) गाव याच साधेपणाचं आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचं मूर्तीमंत उदाहरण आहे. या गावात ना वीज आहे, ना पाण्याची पाईपलाईन, ना पक्के रस्ते. येथील लोक रात्री मेणबत्ती आणि चंद्राच्या प्रकाशात आपलं जीवन जगतात.
गावात वीज का नाही?
काबो पोलोनियो हे गाव मुख्य हायवेपासून जवळपास ७ किलोमीटर अंतरावर आहे. इथे पोहोचण्यासाठी कोणताही पक्का रस्ता नाही. पर्यटकांना इथे पोहोचण्यासाठी खास वाहनांची मदत घ्यावी लागते किंवा पायी चालावं लागतं. पूर्ण गावात फक्त एक लाईटहाऊस अशी वास्तू आहे, जी विजेच्या खांबाशी जोडलेली आहे. बाकी घरे मेणबत्त्या, सोलर पॅनल किंवा पवन ऊर्जेचा वापर करतात. काही घरांमध्ये तर वीज अजिबातच नाही. पाणी विहिरीतून काढलं जातं किंवा पावसाचं पाणी जमा केलं जातं.
लाईटहाऊस सगळ्यात खास
गावाच्या बाहेरील भागात एक उंच लाईटहाऊस आहे. इथून आपण आजूबाजूची बेटं बघू शकता. इथून तीन सुंदर बेटांचा नजारा बघायला मिळतो. पर्यटक इथून जंगलातील प्राण्यांना खेळताना आणि आराम करतानाही सहजपणे बघू शकतात.
कसे राहतात लोक?
काबो पोलोनियोमधील लोकांचं जीवन फारच साधं आहे. इथे ना सीवेज सिस्टीम आहे, ना मोठं मार्केट. रात्र होताच पूर्ण गाव मेणबत्त्या आणि स्ट्रील लॅम्पच्या प्रकाशात उजळतं. मोबाईल नेटवर्क आलं आहे, पण फोन चार्ज करण्यासाठी लोकांना मुख्य किराणा दुकानात जावं लागतं. कारण तिथे जनरेटर आहे. विजेची कमतरता येथील मोठी समस्या आहे.
सोयी कमी, तरी पर्यटकांची गर्दी
हे गाव आधी मासेमारी करणाऱ्या लोकांचं ठिकाण होतं. जे नंतर एक पर्यटन स्थळ बनलं. उन्हाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ते इथे शांत समुद्र किनारे, साधेपणा आणि प्राणी बघण्यासाठी इथे येतात. समुद्री किनारे, लाईटहाऊस आणि स्थानिक हस्तशिल्पाची दुकाने इथे वेळ घालवण्यासाठी मुख्य आकर्षण असतात.
काबो पोलोनिया अशा ठिकाणांपैकी एक आहे, जिथे लोक आत्मशांती मिळवण्यासाठी येतात. इथे साधारण १०० च्या आसपास घरे आहेत. ज्यांमध्ये साधारण १२८ लोक राहतात. हे गाव शहरांच्या धावपळीपासून, गोंधळापासून दूर जाण्याची संधी देतं.
Web Summary : Cabo Polonio, Uruguay, lacks electricity, piped water, and paved roads. Yet, tourists flock to this remote village for its tranquility, pristine beaches, and unique, simple lifestyle. The lighthouse, local crafts, and natural beauty are major attractions.
Web Summary : उरुग्वे के काबो पोलोनियो में बिजली, पानी और पक्की सड़कें नहीं हैं। फिर भी, पर्यटक शांत समुद्र तटों और सरल जीवनशैली के लिए आते हैं। लाइटहाउस, स्थानीय शिल्प और प्राकृतिक सुंदरता मुख्य आकर्षण हैं।